पुणे : भारतीय अंतराळ संस्थेने आज चंद्रावर यशस्वीपणे चंद्रायान ३ उतरवण्याचा या मोहिमेतील सर्वात मोठा टप्पा पार पाडला आहे. यामुळे संपुर्ण भारतात मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. चंद्रायान ३ मोहिमेमधील विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरले असून आता चंद्रावरील पाणी तसेच इतर घटकांचा अभ्यास याद्वारे केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा…“केंद्र सरकार कुटील डाव रचून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर सूड कशासाठी उगवतंय?” ठाकरे गटाचा सवाल
‘चंद्रयान ३’ मोहिमेमधील विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरले आणि या मोहिमेतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा आज पार पडला… या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. देशातील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांचं हे यश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दिशादर्शक नेतृत्वाचं आणि पाठिंब्याचं बळ शास्त्रज्ञांच्या पाठीशी आहे. श्रीहरीकोटा येथून १४ जुलैला ‘चंद्रयान ३’ हे चंद्राच्या दिशेने झेपावलं. अनेक अवघड टप्पे त्याने यशस्वीपणे पार केले. ‘चंद्रयान ३’ कडून वेळोवेळी पाठवण्यात आलेली छायाचित्रे आणि यानाची सकारात्मक प्रगती ही आजच्या या यशाची ग्वाही देत होते. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“केंद्र सरकार कुटील डाव रचून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर सूड कशासाठी उगवतंय?” ठाकरे गटाचा सवाल
माझ्या मते या यशामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचे महत्व नसून देशातील वैज्ञानिक आणि मेहनत करणाऱ्या लोकांचे कष्ट आहेत. त्यांचं हे यश आहे. यामध्ये राजकारण न आणता आपण पाहिलं आहे. वैज्ञानिकांचे अभिनंदन आणि आभार. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केले आहे.
चांद्रयन ३ चे यशस्वी लॅंडिंग करून हिंदुस्थानने एक नवा इतिहास रचला आहे. संपुर्ण देशाला आणि प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा असा हा क्षण आहे. या मोहिमेला बळ देणाऱ्या सगळ्या ज्ञात अज्ञात लोकांच्या मेहनतीला मी कोटी कोटी वेळा वंदन करतो. असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांसह ठाकरे, अशोक चव्हाणांची मुंबईत बैठक, इंडिया मुंबईत जोरदार बॅंटिंग करणार
हेही वाचा…“आता पापी गद्दारांना राजकारणातून संपवायचं,” उद्धव ठाकरे गडाडले, नगरचा माजी खासदार ठाकरे गटात
हेही वाचा…शेतकऱ्यांची कांदाकोंडी भारती पवारांनी फोडली, उद्यापासून नाशकात कांदा लिलाव
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे आणखी ३ आमदार अजित पवार गटात जाणार, ? शरद पवार गटाच्या तंबूत खळबळ “
हेही वाचा…अजित पवार बारामतीत जाणार, भव्य मिरवणुक अन् जंगी स्वागत, अजितदादांच्या कार्यक्रमाची चर्चा