राज ठाकरे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास राज भवनावर पोहोचले. राज ठाकरे आणि राज्यपाल यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. नेमकी काय चर्चा होणार याची उत्सुकता सर्वांचा लागली होती. तर दुसरीकडे स्वतः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राज ठाकरे याना भेटण्यास उत्सुक असल्याच पाहायला मिळालं.
या भेटीदरम्यान राज्यपाल राज ठाकरेंना सुरुवातीलाच म्हणाले, “हमे महाराष्ट्र मे आके एक साल हुआ, लेकीन हमें महाराष्ट्र के राज के दर्शन नही हुए”.असे बोलत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलं.
राज ठाकरेंनी राज्यपालांसोबतच्या भेटीत लॉकडाऊनमध्ये नागरिकांना आलेल्या वाढीव वीज देयकांचा मुद्दा मांडला. जर हॉटेल्स किंवा अन्य व्यवसायांना करात सवलत मिळत असेल तर वाढीव वीज देयकांचा भुर्दंड नागरिकांना का ? असा मुद्दा राज ठाकरेंनी सरकारसमोर उपस्थित केला आहे.