मुंबई: मुंबईच्या आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर सोमवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या एअरपोर्टचे संचालन आता अदानी ग्रुपकडे आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी एअरपोर्टवर लावलेल्या ‘अदानी एअरपोर्ट’ च्या बोर्डची तोडफोड केली आणि तो उखडून फेकून दिला आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव बदलून अदानी विमानतळ करणं योग्य नाही, ही अदानींची सर्वात मोठी चूक असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय.
हे पण वाचा: मुंबई विमानतळावर शिवसैनिक राडा; ‘अदानी एअरपोर्ट’ बोर्ड उखडून फेकून दिला
जीव्हीके एअरपोर्टकडून अदानीने सर्व मालकी आणि शेअर्स खरेदी केल्यानंतर विमानतळाची मालकी अदानींकडे गेली. परंतु याचा अर्थ हा नाही की छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नाव बदलून अदानी एअरपोर्ट करावं. त्यांच्याकडे मॅनेजमेंटचा अधिकार आहे. मात्र, नाव बदलण्याचा किंवा नाव ठेवण्याचा अधिकार नाही, असंही नवाब मलिक म्हणाले. अदानी एअरपोर्ट लिहिणे हे योग्य नाही. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे तशी घटना त्याठिकाणी घडली आहे. अदानीने लोकांची भावना दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे.
हे पण वाचा: मुख्यमंत्री ठाकरेंची संभाजी भिडेंनी घेतली भेट; दोघांमध्ये बंद खोलीत तासभर चर्चा
शिवसेनेकडून तोडफोड
शिवसेनेने आरोप केला आहे, की आधी हे एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट नावाने ओळखले जात होते. मात्र आता येथे अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावण्यात आला. हे सहन केले जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट नाव असताना ‘अदानी एअरपोर्ट’, असे नाव येथे लावण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया म्हणून भारतीय कामगार सेनेने अदानी एअपोर्ट नाव काढून टाकले, असे भारतीय कामगार सेनेचे सचिव संजय कदम यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा: “मनसेसोबत भविष्यात युती होऊ शकते पण…”, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
काय म्हणाले होते अदानी
मुंबई विमानतळाचे टेकओव्हर पूर्ण झाल्यानंतर गौतम अदानी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले होते, जागतिक दर्जाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचे टेकओव्हर केल्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही मुंबईचा गौरव वाटावे असे काम करू, हे आमचे वचन आहे. अदानी समूह व्यवसाय. लक्झरी आणि मनोरंजनासाठी भविष्यातील विमानतळांचे इकोसिस्टिम उभे करेल. आम्ही हजारो स्थानिक लोकांना नवा रोजगार देऊ.
Read Also :
- चंद्रकांत पाटील यांची घोषणा, निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा
- मुख्यमंत्री ठाकरेंची संभाजी भिडेंनी घेतली भेट; दोघांमध्ये बंद खोलीत तासभर चर्चा
- “मनसेसोबत भविष्यात युती होऊ शकते पण…”, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
- मुंबई विमानतळावर शिवसैनिक राडा; ‘अदानी एअरपोर्ट’ बोर्ड उखडून फेकून दिला
- निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांनी केले मोठे विधान; व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार पण…