पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक मधल्या त्या १५ मिनिटांच्या भेटीनंतर, राज्याच्या राजकीय वर्तुळात मनसे-भाजप या नव्या युतीची चर्चा जोराने सुरु आहे. दरम्यान, दोन्हीकडचे नेते या युतीची शक्यता नसल्याची चर्चा माध्यमांत येऊन करत असले तरीही, राज्याच्या राजकारणात कोणत्याही समीकरणे होऊ शकतात, हे सध्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या उदाहरणावरून स्पष्ट आहे.
निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांनी केले मोठे विधान; व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार पण…
दरम्यान, आज पुन्हा पुण्यातल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी, मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केलं आहे. “भविष्यात युती होऊ शकते, पण अंतिम निर्णय हे आमचे वरिष्ठ नेतेच घेतील. परप्रांतीयांच्यावरून आमच्यात असलेले गैरसमज दूर झाले, तरीही भविष्यात युती होणार की नाही, याचा अंतिम निर्णय आमचे वरिष्ठ नेतेच घेणार आहेत,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
यावेळी त्यांनी, “परप्रांतीयाबाबतच्या राज ठाकरेंच्या भाषणाची क्लिप मला मिळाली आहे. ती कोणी पाठवली याला काहीही अर्थ नाही. ते भाषण मी ऐकले असून त्याबद्दल माझ्या मनात काही शंका आहेत. येत्या दोन दिवसांत राज ठाकरे यांची भेट घेऊन मी चर्चा करणार आहे, पण आमच्यात युतीबाबत कोणतीही चर्चा सुरू झाली नाही. मात्र चर्चेतून प्रश्न सुटतात,” असं म्हणत त्यांनी सूचक विधान केलं आहे.
राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची नाशिकमध्ये भेट झाली होती. यानंतर त्यांच्या युतीची चर्चा झाल्याचं बोललं जात होतं. तसंच राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांना आपल्या परप्रांतीयांच्या भूमिकेसंबंधी गैरसमज दूर व्हावेत यासाठी ऑडिओ क्लिप पाठवल्याचं वृत्त होतं. राज ठाकरेंनी हे वृत्त फेटाळलं होतं. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात, मनसे-भाजप युती अशी मोठी राजकीय घडामोड घडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Read Also :
- मुंबई विमानतळावर शिवसैनिक राडा; ‘अदानी एअरपोर्ट’ बोर्ड उखडून फेकून दिला
- भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; गणेश बीडकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – शिवसेना आक्रमक
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच भिडले शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते
- “भाजपचा अंतकाळ जवळ, कारण निष्ठवंतांना भंगारात आणि उपऱ्यांना, बाटग्यांना पालखीत नाचवलं जातंय”
- पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी, पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा, संजय राठोड यांचा पाय खोलात