सांगली : कृष्णा नदीच्या महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, समवारी सांगलीत आले. यावेळी मुख्यमंत्र्यांसमोरच शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मुख्यमंत्र्यांच्यासमोरच भाजपच्या कार्यकर्यांनी घोषणाबाजी केली. भाजप आणि शिवसेनेचे दोन गट घोषणाबाजी करत आमने सामने आले. त्यामुळे झालेल्या गर्दीला हटवण्यासाठी पोलिसांना सौम्य स्वरूपाचा लाठीमार करावा लागला. सांगलीतील मुख्य पेठेत दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आयर्विन पुलावरून कृष्णा नदीची पाहणी करून पेठेत आले. तेथे व्यापाऱ्यांसह भाजपचे काही लोक आणि विविध संघटना निवेदन देणार होते. पोलिसांनी दहा ते पंधरा संघटनांच्या प्रत्येकी पाच पाच प्रतिनिधींना निवेदन देण्यासाठीची मुभा दिली होती, त्यानुसार लोक जमले होते. मुख्यमंत्री गाडीतून उतरल्यानंतर प्रचंड गर्दी झाली आणि या गर्दीत गोंधळ वाढू नये यासाठी सुरक्षा रक्षकांनी गराडा घातला. त्याच वेळी गोंधळाला सुरुवात झाली. भाजपने घोषणा द्यायला सुरुवात केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने ही घोषणाबाजी सुरू केली. परिणामी मुख्यमंत्र्यांना निवेदन न स्वीकारताच पुन्हा गाडीत बसावे लागले. अन्य संघटना निवेदन देता येणार नसल्याने त्यांनी ही नाराजी व्यक्त केली.
आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही; देवेंद्र फडणवीस म्हणतात….
दोन्ही बाजूने गोंधळ वाढत गेला आणि घोषणा देत भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या आमने-सामने आले. त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. काही संघटनांनी निवेदन देता न आल्यामुळे तेथेच निवेदन फाडून या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. दरम्यान मुख्यमंत्री गाडीत बसून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पेठांमध्ये रस्त्यावर बसून निषेध नोंदवला.
Read Also :
- पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी, पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा, संजय राठोड यांचा पाय खोलात
- बीडीडी चाळ पुनर्विकास: सेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो पाहून भाजपचा जळफळाट?
- आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही; देवेंद्र फडणवीस म्हणतात….
- मुंबईतील मराठी आवाज टिकला आणि दिसला पाहिजे, बीडीडी’ पुनर्विकासप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार यांचे आवाहन
- विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस राज्यसरकार जबाबदार, एमपीएससीच्या जागेवरुन विद्यार्थी आक्रमक