मुंबई: शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण २२ वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पुणे पोलिसांना काही कॉल रेकॉर्डिंग सापडले आहेत. ज्यामुळे संजय राठोड यांचा पाय अधिकच खोलात गेला आहे. दरम्यान, याच प्रकरणामुळे संजय राठोड यांना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं होतं.
हे पण वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी
गेल्या काही महिन्यांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. ज्यामध्ये आता पुणे पोलिसांच्या हाती काही अत्यंत महत्त्वाचे पुरावे लागले आहेत.
हे पण वाचा: भाजपमधील भुंकणाऱ्या लोकांचे तोंड बंद करायला फारसा वेळ लागणार नाही – विनायक राऊत
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांना पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात फोनवरुन जे संभाषण झालं होतं त्याच्या अनेक रेकॉर्डिंग सापडल्या आहेत. या रेकॉर्डिंगमध्ये त्यांचा एक कॉल हा तब्बल ९० मिनिटांपर्यंत सुरु होता. जो पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या करण्याच्या चार ते पाच दिवसांपूर्वीचा होता. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
हे पण वाचा: भाजप नेत्याला सत्तेचा माज चढलायं, राज्यघटना पाण्यात बुडवण्याची भाषा चुकीची – दिपाली धुमाळ संतापल्या
पूजाने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुण्यात राहत असलेल्या इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. ज्यानंतर दोन दिवसांनी काही फोन कॉल रेकॉर्डिंग हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर विरोधी पक्षाने याप्रकरणी आवाज उठवत सरकारवर जोरदार टीका केली. अखेर याचप्रकरणी दबाव वाढल्याने संजय राठोड यांना २८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
Read Also :
- बीडीडी चाळ पुनर्विकास: सेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो पाहून भाजपचा जळफळाट?
- आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही; देवेंद्र फडणवीस म्हणतात….
- मुंबईतील मराठी आवाज टिकला आणि दिसला पाहिजे, बीडीडी’ पुनर्विकासप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार यांचे आवाहन
- विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस राज्यसरकार जबाबदार, एमपीएससीच्या जागेवरुन विद्यार्थी आक्रमक
- “सेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जावं लागेल’’ सामनातून भाजप आमदारावर टीका