पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले आहे. त्यांनी लिहिलेल्या संविधानावर हे सगळे चालले आहे. हे सर्वांनाच माहित आहे. ते सांगण्याची गरज नाही. परंतू, असे असताना राज्यघटना पाण्यात बुडवा असे वक्तव्य करत असाळ तर तुम्हाला सत्तेचा माज आलाय, असेच म्हणावे लागेल, अशा शब्दात पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या तथा राष्ट्रवादीच्या नगरसेविका दिपाली धुमाळ यांनी संताप व्यक्त केला.
हे पण वाचा : “घटना समुद्रात बुडावा” म्हणणाऱ्या भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेड आक्रमक
ईश्वरा समान असलेल्या शिवाय अवघा राष्ट्र ज्या राज्य घटनेच्या आधारावर चालते, सर्वसामान्यांच्या जगण्याचा, न्यायाचा आधार असलेल्या राज्य घटनेबद्दल असे वक्तव्य करणे चुकीचेच आहे. असे असताना वक्तव्य करणे म्हणजे बीडकरांना सत्तेची मस्ती चढली आहे का? असंच म्हणावे लागेल. दरम्यान, गणेश बीडकर यांनी जनतेसमोर येवून माफी मागावी, अशी मागणी आमचे नेते शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही पुढील कारवाईसाठी नक्कीच प्रयत्न करू, असेही दिपाली धुमाळ यांनी सांगितले.
हे पण वाचा : “घटना समुद्रात बुडावा” भाजपच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी
काय आहे नेमके प्रकरण?
२३ गावांच्या विकास आराखड्याला दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन कार्यक्रमात मंजूरी देण्यात आली. त्यानंतर एका डिजीटल माध्यमांनी २३ गावांचा विकास आराखडा की आखाडा?, या विषयावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर प्रशांत जगताप आणि भाजपचे नगरसेवक तथा सभागृह नेते गणेश बीडकर यांना आमंत्रित केले होते. २३ गावांच्या विकास आराखड्यावर स्पष्टिकरण देतावेळी गणेश बीडकर यांनी चक्क राज्यघटना मान्य नसेल तर ती समुद्रात बुडवा, असे वक्तव्य केले. त्यावेळी शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी निषेध नोंदवून गणेश बीडकर यांनी जनतेसमोर दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी केली.
हे पण वाचा : पुण्यात रस्त्यांची चाळण, ठेकेदाराच्या कामावर महापालिकेचे नियंत्रणच राहिले नाही; विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ
गणेश बीडकरांकडून दिलगिरी व्यक्त
एका डिजीटल माध्यमावरी चर्चेत बोलताना ‘घटना समुद्रात बुडवा’ हे वक्तव्य संदर्भासहित ऐकावे. यावर माझी भूमिका मांडण्यापूर्वी मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या मूळ मुद्द्याला उत्तर देतां येत नसल्याने माझ्या वक्तव्याचे भांडवल केले जाते आहे. माझ्या एखाद्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून घटना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न मी कधीही यशस्वी होउ देणार नाही. तरीही माझ्या तोंडून अनावधानाने चुकीचे शब्द गेले असल्यास मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे स्पष्टिकरत भाजपचे गणेश बीडकर यांनी त्यांच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून केले आहे.
गुन्हा दाखल होणार का?
गणेश बीडकर यांनी घटनेचा अवमाने केला आहे. त्यांचा राजीनामा घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शहरातील विविध संघटना करू लागल्या आहेत. त्यामुळे गणेश बीडकर राजीनामा देणार का?, त्यांच्यावर कारवाई होणार का?, राजीनामा दिल्यास अथवा कारवाई झाल्यास गणेश बीडकरांना मोठ्या संकटांना समोरे जावे लागणार आहे. शिवाय त्यांचे राजकिय करीअर देखिल धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजीनाम्याच्या मागणीमुळे गणेश बीडकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे बीडकरांवर कारवाई होणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- कुणी थप्पड देण्याची भाषा करु नका, अशी थप्पड मारु की कोणी उठणार नाही – उद्धव ठाकरे
- पुण्यात रस्त्यांची चाळण, ठेकेदाराच्या कामावर महापालिकेचे नियंत्रणच राहिले नाही; विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ
- तु फक्त निवडणुक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील, तुला गाडतील; भाजप आमदारावर शिवसेना खवळली
- आम्हाला वाट्टेल तिथे कार्यालय उभं करू, मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेना लिहिलेलं नाही!
- निर्बंध कायम, पुणेकरांना दिलासा नाहीच; वाचा महापालिकेचे नवे आदेश