पुणे : आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील २५ जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा केल्यानंतर, पुणे जिल्ह्यांत काय निर्बंध असणार याबद्दल साशंकता निर्माण झाली होती.
“घटना समुद्रात बुडावा” भाजपच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी
या पार्श्वभूमीवर आज महापालिकेकडून नवीन अध्याद्देश जारी केले असून, हे नवीन निर्बंध आज रात्री म्हणजे उद्या १ ऑगस्ट पासून लागू होणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत आदेश दिले असून, शहरात यापुढेही आत्तापर्यंतचे नियम लागू राहणार आहेत. मात्र तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात तिसऱ्या स्तरातील नियम लागू केल्याने शहरातील निर्बंध वाढले आहेत.
- व्यापाऱ्यांकडून, मॉल चालकांकडून निर्बंध शिथिल करण्याची, दुकानांच्या वेळा वाढवण्याची मागणी, मात्र महापालिकेने त्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही.
- अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं शनिवारी व रविवारी बंद.
- शहरातील शाळा, महाविद्यालये, सर्व शैक्षणिक संस्था बंद.
- सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
- अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
- मॉल्स/सिनेमागृहे (मल्टिप्लेक्ससह एकल स्क्रिन)/नाटयगृहे इत्यादी बंद राहतील.
- रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार ५०% बैठक क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, संध्याकाळी ४ वाजेनंतर व शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे/पार्सल सर्व्हिस आणि होम डिलेव्हरी सेवा सुरू राहील.
- उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत बृहन्ममुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील..
- सार्वजनिक ठिकाणे/खुली मैदाने/चालणे/ सायकलिंग दररोज सकाळी ५ वाजल्यापासून सकाळी ९ पर्यंत सुरू राहतील.
- खाजगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत (सुट देण्यात आलेली कार्यालये वगळून) सुरू राहतील.
- कार्यालयीन उपस्थिती- शासकीय कार्यालयांसह (खाजगी- जर परवानगी असेल) ५०% क्षमतेने सुरू राहतील.
- क्रीडा- सकाळी ५ वा.पासून सकाळी ९ वा./ सायं ६ वा. पासून सायं.९ पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील.
- चित्रीकरण Bubble च्या आतमध्ये संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल.
- सामाजिक मेळावे / सांस्कृतिक / करमणूक ५०% बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
- लग्न समारंभ फक्त ५० लोकांच्या मर्यादेतच करता येतील.
- अंत्यसंस्कार विधी फक्त २० लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल.
- बैठका/स्थानिक संस्थांच्या/ सहकारी संस्थांच्या निवडणूका हॉलच्या/सभागृहाच्या ५० टक्के बैठक क्षमतेने घेणेस परवानगी राहील.
- बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल.
- कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सूरु राहतील.
- ई-कॉमर्स- साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील.
- जमावबंदी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत व संचारबंदी संध्याकाळी पाचनंतर लागू राहील.
- व्यायामशाळा/केश कर्तनालय/ ब्युटी सेंटर्स/ स्पा/ वेलनेस सेंटर्स संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ५०% क्षमतेने सुरु राहतील. परंतू, गि-हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही.
- सार्वजनिक परिवहन सेवा १००% बैठक क्षमतेने सुरू राहतील. परंतू, प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.
- मालवाहतूक जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह (वाहन चालक/ हेल्पर/ स्वच्छक किंवा इतर असे ३ ) लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील.
- खासगी कार / टॅक्सी / बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी (आंतर जिल्हा प्रवासासाठी स्तर ५ मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास किंवा त्यामधून जात असल्यास, प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक राहील) नियमितपणे परवानगी राहील.
- उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरू राहतील.