पुणे : मनुस्मृती समर्थक भाजपचे गणेश बिडकर ‘राज्यघटना अरबी समुद्रात बुडवा…’ म्हणतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे. भाजपाला भारतीय संविधान मान्य नाही हे संपूर्ण देशाला माहिती आहे. म्हणूनच दिल्लीत संविधान फाडला गेलं. त्याच पक्षाचे गणेश बिडकर ऑनलाईन (Online) चर्चेमध्ये दोन वेळेस ‘राज्य घटना बुडवा’ असं वक्तव्य करतात. या प्रकरणी गुन्हा दाखल नाही केला तर संभाजी ब्रिगेड पोलिसात तक्रार करणार आहे, अशी आक्रमक भूमिका संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी घेतली आहे.
हे पण वाचा : “घटना समुद्रात बुडावा” भाजपच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी
भारतीय राज्यघटनेचा आधार घेऊनच स्वीकृत नगरसेवक असताना गणेश बिडकर मागच्या दरवाजाने पुणे महापालिकेत सभागृहनेते झाले, हे उपकार गणेश बिडकर विकासाच्या खोट्या गप्पा मारताना विसरले. पुण्याची वाट लावणारे नेते जर संविधानाचा अवमान करत असतील तर आम्ही ते खपवून घेणार नाही. भारतीय संविधानाचा अर्थात राज्यघटनेचा अवमान केल्याप्रकरणी गणेश बिडकर यांचे नगरसेवक पद रद्द करून त्यांनी यांनी तात्काळ माफी मागावी व पुणे पोलिसांनी स्वतःहून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असेही शिंदे यांनी सांगितले.
काय आहे नेमके प्रकरण?
२३ गावांच्या विकास आराखड्याला दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन कार्यक्रमात मंजूरी देण्यात आली. त्यानंतर एका डिजीटल माध्यमांनी २३ गावांचा विकास आराखडा की आखाडा?, या विषयावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर प्रशांत जगताप आणि भाजपचे नगरसेवक तथा सभागृह नेते गणेश बीडकर यांना आमंत्रित केले होते. २३ गावांच्या विकास आराखड्यावर स्पष्टिकरण देतावेळी गणेश बीडकर यांनी चक्क राज्यघटना मान्य नसेल तर ती समुद्रात बुडवा, असे वक्तव्य केले. त्यावेळी शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी निषेध नोंदवून गणेश बीडकर यांनी जनतेसमोर दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी केली.
गणेश बीडकरांकडून दिलगिरी व्यक्त
एका डिजीटल माध्यमावरी चर्चेत बोलताना ‘घटना समुद्रात बुडवा’ हे वक्तव्य संदर्भासहित ऐकावे. यावर माझी भूमिका मांडण्यापूर्वी मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या मूळ मुद्द्याला उत्तर देतां येत नसल्याने माझ्या वक्तव्याचे भांडवल केले जाते आहे. माझ्या एखाद्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून घटना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न मी कधीही यशस्वी होउ देणार नाही. तरीही माझ्या तोंडून अनावधानाने चुकीचे शब्द गेले असल्यास मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे स्पष्टिकरत भाजपचे गणेश बीडकर यांनी त्यांच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून केले आहे.
गुन्हा दाखल होणार का?
गणेश बीडकर यांनी घटनेचा अवमाने केला आहे. त्यांचा राजीनामा घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शहरातील विविध संघटना करू लागल्या आहेत. त्यामुळे गणेश बीडकर राजीनामा देणार का?, त्यांच्यावर कारवाई होणार का?, राजीनामा दिल्यास अथवा कारवाई झाल्यास गणेश बीडकरांना मोठ्या संकटांना समोरे जावे लागणार आहे. शिवाय त्यांचे राजकिय करीअर देखिल धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजीनाम्याच्या मागणीमुळे गणेश बीडकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे बीडकरांवर कारवाई होणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- तु फक्त निवडणुक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील, तुला गाडतील; भाजप आमदारावर शिवसेना खवळली
- आम्हाला वाट्टेल तिथे कार्यालय उभं करू, मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेना लिहिलेलं नाही!
- निर्बंध कायम, पुणेकरांना दिलासा नाहीच; वाचा महापालिकेचे नवे आदेश
- “हे निगरगट्ट सरकार लोकशाहीला घातक, जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार नाही”
- पूरग्रस्त भागात संपूर्ण वीजबिल माफी अशक्य; मात्र दिलासा देण्यासाठी ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा