मुंबई: भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं. वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, असं चिथावणीखोर वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी, सेना नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी लाड यांच्यावर टीकेची झोड उठवलीय. त्यानंतर प्रसाद लाड यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं म्हणत पलटी मारली खरी पण त्यांच्या वक्तव्यावरुन अजूनही टीका सुरुच आहे.
हे पण वाचा: “अजित पवारांना फक्त स्वत:च्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता, इतरांचं काही पडलेलं नाही” – भाजप
खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा थपडीची भाषा केली आहे. तसेच सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरपार लढाईची भाषा केली आहे. शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जाण्याची वेळ येईल, असा इशारा देत यायचंय तर या मग, असं बोलावणंच संजय राऊत यांनी लाड आणि राणेंना धाडलं आहे.
हे पण वाचा: तु फक्त निवडणुक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील, तुला गाडतील; भाजप आमदारावर शिवसेना खवळली
बाटगे आणि शिखंडींच्या टोळ्या हाताशी धरून मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या कोण टाकत असेल तर मराठी माणूस त्या राजकीय बेवड्यांचा चोख बंदोबस्त केल्याशिवाय राहाणार नाही! तरीही अंगावर यायचे असेल तर या; अर्थात तेवढी मर्दानगी अंगात असेल तर! पण एक लक्षात ठेवा, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावर; च जाण्याची वेळ येईल. त्यासाठी येताना ‘खांदेकरी’ ही घेऊन या. महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्यांना खांद्यावरच जावे लागते, हा इतिहासच आहे!
हे पण वाचा: भाजपमधील भुंकणाऱ्या लोकांचे तोंड बंद करायला फारसा वेळ लागणार नाही – विनायक राऊत
कालपर्यंत कुणा दुसऱ्यांच्या बॅगा उचलून गुजराण करीत होते. आज पोटापाण्यासाठी आणखी कुणाचे तरी जोडे उचलत आहेत! असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ ठरत आले, पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. त्यांचे नामोनिशाणही उरले नाही. शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच.. असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे.
Read Also :
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी
- “स्वबळाचा नारा हा आमचा हक्क, आम्ही देखील स्वबळाचा नारा देवू”- मुख्यमंत्री
- तुम्ही बैठकीला बोलवा, आम्ही लगेच येवू; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र… वाचा सविस्तर…
- कुणी थप्पड देण्याची भाषा करु नका, अशी थप्पड मारु की कोणी उठणार नाही – उद्धव ठाकरे
- पुण्यात रस्त्यांची चाळण, ठेकेदाराच्या कामावर महापालिकेचे नियंत्रणच राहिले नाही; विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ