मुंबई : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापना केलेल्या शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापन दिन असून, या निमित्ताने आज शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, शिवसैनिकांशी दूर दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी, अप्रत्यक्षपणे काँग्रेसला चिमटा काढत, “सध्या अनेक राजकीय पक्ष महामारीच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही हा नारा देऊ, तो आपला हक्क आहे. आपण आपली ताकद दाखवली पाहिजे, स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास हा हवाच. ‘स्वबळ’ म्हणजे फक्त निवडणुका लढणे नाही, अभिमानाचं, न्याय हक्क मागण्यासाठी स्वबळ हवं, तलवार उचलण्याची ताकद आधी कमवा, मग वार करा, माझ्यासाठी स्वबळ हे आहे.’ अशा शब्दांत त्यांनी शिवसैनिकांना संबोधले.
हे पण वाचा, राणे पिता-पुत्रांना बाळासाहेबांनी मोठे केले; काहीही बोलू नका आणि उपकार विसरू नका
यावेळी, “मी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची झूल अंगावरून बाजूला ठेवून, आज तुमच्याशी बोलतोय. शिवसेनेच्या या ५५ वर्षांच्या वाटचालीचं श्रेय, ज्यांनी-ज्यांनी शिवसेना जोपासली, वाढवली, त्या तमाम शिवसैनिकांना जातं. त्या सर्वाना माझं अभिवादन. माझ्या शिवसैनिकांना ५५ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा, या शुभेच्छा देताना, आपण जनतेसाठी केलेलं गेल्या दीड वर्षातलं, आपलं काम बोलतंय. मात्र, अनेकांच्या पोटात दुखतंय. काय म्हणून दुखतंय, कदाचित सत्ता नाही म्हणून दुखत असावं, ते त्यांचं त्यांनी पाहावं, माझ्याकडे त्यांच्यासाठी औषध नाही. मात्र, त्याचं राजकीय औषध मी देईन,” असं म्हणत त्यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे.
हे पण वाचा, “आम्ही मराठी माणसाचा विषय कधीच सोडला नाही, त्यामुळे शिवसेना मराठी माणसाच्या मनात”
तसेच, “प्रमोद नवलकर म्हणायचे, शिवसैनिकांसाठी तीनच सण, २३ जानेवारी, शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस, १९ जून शिवसेनेचा वर्धापन दिन आणि, 13 ऑगस्ट मार्मिकचा वर्धापन दिन. आपण सगळे हे तिन्ही दिवस उत्सवासारखे साजरे करतो आणि ते केलेच पाहिजेत. दरम्यान या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Read Also :
- फडणवीस सरकारच्या काळातील महापालिका प्रभाग रचनेला, महाविकास आघाडीने लावला सुरुंग
- “लोका सांगे ब्रह्मज्ञान ‘राष्ट्रवादी’ मात्र कोरडे पाषाण”, राष्ट्रवादी भवनच्या उदघाटनाला तुफान गर्दी
- “कोणी कितीही शड्डू ठोकू देत, मुंबईचा पुढचा महापौर शिवसेनेचाच”
- फटके देणारी शिवसेना राहिली नाही, आताची शिवसेना बिनशिंगाची – नारायण राणे
- भाजप-शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरूच, निलेश राणेंनी काढली शिवसेनेची लायकी, म्हणाले…