पुणे : आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भव्य कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नव्या भवनाच्या आवारात प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. या गर्दीत महामारीच्या सामाजिक अंतराच्या नियमांचा पूर्णपणे फज्जा उडालेला असून, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनीच या नियमांना हरताळ फासल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावर अदयाप अजित पवारांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून, त्यामुळे एकीकडे “लोका सांगे ब्रह्मज्ञान ‘राष्ट्रवादी’ मात्र कोरडे पाषाण”, असं म्हणण्याची वेळ या प्रकारामुळे आलं आहे.
हे पण वाचा, जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना १५ दिवस क्वारंटाईन करणार; अजित पवारांचा इशारा
पुणेकरांवर काल रात्री उशिरा, विकेंड लॉकडाऊनचा निर्णय तडकाफडकी लावल्यानंतर, आज सकाळी पवार यांनी पुणेकरांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी लॉकडाऊन उठवल्यांनंतर पुणेकरांनी केलेल्या गर्दीवर त्यांनी संताप व्यक्त केला आणि पुणेकरांना काटेकोरपणे महामारीच्या सर्व नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. मात्र, आता त्यांच्याच भव्य कार्यालयाच्या उद्घाटनाला झालेली ही गर्दी पाहिल्यानंतर, प्रत्येक पुणेकर आज त्यांच्या या निर्णयावर वर मनातल्या मनात संताप व्यक्त करत असेल, हे नक्की.
हे पण वाचा, “अजित पवारांकडे १० सेकंद थांबून विचारपूस करायला देखील माणुसकी शिल्लक नाही”
त्यामुळे जे सर्व नियम असतात, ते अश्यावेळी राजकारण्यांसाठी माफ आणि जनतेसाठी फक्त लागू असतात का, स्वतः उपमुख्यमंत्रीच जर नियमावली पायदळी तुडवत असतील, तर ते जनतेकडून हे नियम पाळले जातील, याची अपेक्षा कशी ठेवू शकतात, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे.
हे पण वाचा, बीडने दाखवली उपमुख्यमंत्र्यांसमोर नाराजी; जमावाने अडवला ताफा, तर इसमाने घातला राडा
दरम्यान, आज पुण्यात वीकेंड लॉकडाऊन असल्याने, पुणेकरांचा हिरमोड झाला आहे. आज पुणेकर मोठ्या संख्येने आजूबाजूच्या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाणार आणि गर्दी होऊन महामारीला आमंत्रण मिळू शकते, हे लक्षात घेऊन पुण्यात हा लॉकडाऊन लावला गेला आहे. या दोन दिवशी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी पर्यटनासाठी गर्दी करू नये. नाहीतर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाइन करावे लागेल,” असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. मात्र दुसरीकडे पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी ही तोबा गर्दी पहायला मिळत आहे.
Read Also :
- ‘गतवर्षी केलेल्या ‘करेक्ट’ कार्यक्रमाची होणार याही वर्षी होणार पुनरावृत्ती’
- भाई जगतापांनी बोलून दाखवली खंत, या आघाडीत काँग्रेस ‘तिसराच’
- पुण्यात पुन्हा विकेंड लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद
- कोणताही पक्ष स्वतःला गुंड म्हणून घेणार नाही, राऊतांना अजित पवारांनी सुनावलं
- ‘आम्ही तेवढ्या एकाच कारणासाठी महाविकास आघाडीत सामील’- काँग्रेस