बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, यावेळी बीड जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांचे स्वागत ताफा अडवून केले आहे. यावेळी वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी, थेट उपमुख्यमंत्र्यांची गाडी अडवली, एवढेच नाही तर त्यांच्या गाडी समोर लोटांगण घातले. त्यामुळे, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांवर लाठीमार केला आहे.
हे पण वाचा, ‘मराठा समाजासाठीच्या योजनांसाठी निधीची अडचण येऊ देणार नाही’
बीड जिल्ह्यात अजित पवार आज, महामारी आणि खरीप हंगामाबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठकीसाठी आले आहेत. यावेळी, पालकमंत्री धनंजय मुंडे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि लोकप्रतिनिधी, तसेच अधिकारी यांच्यासोबत त्यांची बैठक सुरु असताना, बाहेर कंत्राटी नर्स आणि मराठा आरक्षण आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
हे पण वाचा, ‘तो दिवस लांब नाही ज्या दिवशी शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील’
तसेच, यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी देखील, उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याची मागणी करत, मराठा आंदोलन कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घुसखोरी केली आणि घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी एका तरुणाने, सुरक्षा व्यवस्था भेदून, बैठकीच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, ‘एक मराठा, लाख मराठा’ म्हणत, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी त्याने यावेळी केली. तेव्हा तिथे तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनी या तरुणाला लगेच ताब्यात घेतले आहे.
हे पण वाचा, ‘संपूर्ण शिवसेनाच आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार ?’
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या लाठीमारा दरम्यान, महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला असून, यावेळी पोलिसांनी १०० पेक्षा कंत्राटी परिचारिकांना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन परिसरात स्थानबद्ध केले आहे.
पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
या सगळ्या प्रकारावर भाजप नेत्या, पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून, ‘हा सगळा प्रकार संतापजनक असल्याचे आणि ज्यांची जबाबदारी होती ते कमी पडले,’ असल्याची भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. तसेच, ‘स्वतःच्या जिल्ह्यात उपमुख्यमंत्री आलेत, तेव्हा उपमुख्यमंत्र्यांना इथल्या लोकांना भेटवणं, त्यांच्या समस्या जाणून घ्यायला लावणं, हे स्थानिक नेत्यांचं काम आहे,’ असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे धंनजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.०
Exclusive: बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर राडा @News18lokmat pic.twitter.com/meQFm6N9d4
— News18Lokmat (@News18lokmat) June 18, 2021
Read Also :
- ‘माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर मग हा असेल?’
- ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजपा, एकत्र येणार?
- महापालिका निवडणुकांसाठी आयोगाची तयारी, मुंबईसह १० महापालिकांची निवडणूक होणार एक सदस्य प्रभाग पद्धतीनं?
- मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास, त्याला शिवसेना जबाबदार असेल!
- सरकार तुमचे ऐकते मग आंदोलन कशाला? संभाजीराजे यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढू!