मुंबई : अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठीच्या जमीन खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्यावरून शिवसेना भवन परिसरात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले होते. यावरून आता भाजप-शिवसेना नेत्यांमध्ये शाब्दिक वॉर सुरू झाले आहे.
या घटनेवर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सज्जड दमच भाजपला भरला. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.
दादर मध्ये सेना भवन आहे… दादर कोणाच्या बापाचं नाही. तो दिवस लांब नाही ज्या दिवशी सेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील. संज्या गुंडगिरीच्या वार्ता करतो ह्यापेक्षा मोठा विनोद नाही. लुक्का आहे एक नंबरचा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 17, 2021
संजय राऊत यांचा लुक्का असा उल्लेख करत लवकरच शिवसेना भवनाच्या काचा फुटलेल्या दिसतील, असा इशाराच निलेश राणेंनी दिला आहे.
दादर मध्ये सेना भवन आहे… दादर कोणाच्या बापाचं नाही. तो दिवस लांब नाही ज्या दिवशी सेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील. संज्या गुंडगिरीच्या वार्ता करतो ह्यापेक्षा मोठा विनोद नाही. लुक्का आहे एक नंबरचा, असे प्रत्युत्तर निलेश राणे यांन ट्विट करत दिले आहे.
Read Also :
- ‘संपूर्ण शिवसेनाच आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार ?’
- ‘तुम्हाला भंडाऱ्यात बसवण्याची व्यवस्था करू’, दरेकरांचे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर
- ‘…म्हणून रामभक्तांनी एक अराजकीय समिती तयार करावी’
- विनामास्कचा दिसेल त्याचं तिकीट कट होणार – सुप्रिया सुळे
- ‘पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली, आता पुढच्या पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल’