पुणे : गेल्या काही दिवसात पुण्यातील कोरोनारुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले होते, मात्र त्यामुळे बाजारपेठा आणि दुकानांमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहायला मिळाले. यामुळे आता प्रशासनाने पुन्हा एका विकेंड लॉकडाउनची घोषणा केली आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत विकेंड लॉकडाउनची माहिती दिली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं शनिवार-रविवार बंद असतील.
शनिवार-रविवार सर्व दुकानं, मॉल, सलून बंद राहणार !
पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 18, 2021
पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
दरम्यान, पुणे महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर आजपासून (19 जून) 30 ते 44 या वयोगटासाठीही कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात आली असून यासाठी 15 लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
Read Also :
- ‘पंतप्रधानांचाच वारसा जपत भाजपने पुणे महापालिकेच्या प्रॉपर्टी विकण्याचा सपाटा लावला आहे’
- ‘तो दिवस लांब नाही ज्या दिवशी शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील’
- ‘संपूर्ण शिवसेनाच आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार ?’
- ‘तुम्हाला भंडाऱ्यात बसवण्याची व्यवस्था करू’, दरेकरांचे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर
- ‘…म्हणून रामभक्तांनी एक अराजकीय समिती तयार करावी’