पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे देशातील कंपन्या विकत आहेत, त्याच प्रमाणे पुणे महापालिकेने देखील प्रॉपर्टी विकण्याचा सपाटा लावल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.
पुणे महापालिकेने काही दिवसांपूर्वी पालिकेचा मालकीचा फ्लॅट ची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून आता राष्ट्रवादीकडून टीका केली जात आहे.
200 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्यासाठी म्हणून महानगरपालिकेच्या मालकीच्या 1260 फ्लॅट विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव हा त्यातीलच एक भाग आहे. फ्लॅट विक्रीचा जो निर्णय घेण्यात आला आहे, तो केवळ 200 कोटी रुपयांचा नाही. तर, या फ्लॅटची किंमत सुमारे 2200 कोटींच्या घरात असल्याचे प्रशांत जगताप म्हणाले.
गोरगरीबांचे नाव पुढे करून स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आणि सभागृह नेते गणेश बीडकर हे एकप्रकारे इस्टेट एजंट आहे. कोथरूडचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या मर्जीनेच हा कारभार सुरू असल्याची शक्यताही जगताप यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांचाच वारसा जपत महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने पुणे महानगरपालिकेच्या अनेक प्रॉपर्टी विकण्याचा सपाटा लावल्याचा आरोप त्यांनी केला.
Read Also :
- ‘तो दिवस लांब नाही ज्या दिवशी शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील’
- ‘संपूर्ण शिवसेनाच आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार ?’
- ‘तुम्हाला भंडाऱ्यात बसवण्याची व्यवस्था करू’, दरेकरांचे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर
- ‘…म्हणून रामभक्तांनी एक अराजकीय समिती तयार करावी’
- विनामास्कचा दिसेल त्याचं तिकीट कट होणार – सुप्रिया सुळे