सिंधुदुर्ग : संजय राऊत यांनी राम मंदिराच्या कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी केलेल्या वक्तव्यावरून, तसेच, राम मंदिर उभारणीच्या निधी संकलनावरून सामानात लिहिलेल्या अग्रलेखावरून, राज्यात चांगलाच वादंग पेटला असून, यावरून शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनासमोर तुंबळ हाणामारी झाली. दरम्यान, या वादामुळे शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये देखील जोरदार शाब्दिक युद्ध सुरु असून, आज शिवसेनेचा वर्धानपनदिन आहे, त्यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
हे पण वाचा, शिवसेना आमदाराची भन्नाट ऑफर, भाजपचं ओळखपत्र दाखवा आणि मोफत मिळवा पेट्रोल
आज शिवसेनेचा ५५ वा वर्धानपनदिन आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर विविध उपक्रम शिवसेनेकडून आणि शिवसनेच्या विविध संघटनांकडून आयोजित केले गेले आहेत. असाच एक उपक्रम, सिंधुदुर्गातील एका पेट्रोल पंपावर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी, भाजपला डिवचण्यासाठी सुरु केला. त्यांनी या पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केले. मात्र, हा पेट्रोलपंप नेमका नारायण राणे यांच्या मालकीचा निघाला आणि नारायण राणेंची मालकी असलेल्या या पेट्रोल पंपावर, शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी सकाळी तुफान राडा झाला आहे.
हे पण वाचा, ‘… तर जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहणार नाही’, वर्धापनदिनी सेनेचा इशारा
दरम्यान, यानंतर निलेश राणे यांनी लगेच ट्विट करत शिवसेनेची लायकी काढली असून, “शिवसेना पक्ष इतका भिकारी झाला आहे की त्यांच्या आमदाराला दुसऱ्यांच्या पेट्रोल पंपावर फुकट पेट्रोल भरून शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा करायचा आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक भिकाऱ्यासारखा पंपा बाहेर उभा होता तेव्हा त्याला तिथून हाकलून दिलं. ही लायकी आजच्या शिवसेनेची आहे,” असा घणाघात त्यांनी केला आहे.
शिवसेना पक्ष इतका भिकारी झाला आहे की त्यांच्या आमदाराला दुसऱ्यांच्या पेट्रोल पंपावर फुकट पेट्रोल भरून शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा करायचा आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक भिकाऱ्यासारखा पंपा बाहेर उभा होता तेव्हा त्याला तिथून हाकलून दिलं. ही लायकी आजच्या शिवसेनेची आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 19, 2021
हे पण वाचा, ‘आंदोलन करायला भाजप आजही घाबरली नाही आणि उद्याही घाबरणार नाही’
आज सकाळी, वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी पैसे वाटत होते. याचवेळी, भाजप कार्यकर्ते त्याठिकाणी आले आणि त्यांनी याला आक्षेप घेतला. यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणबाजी सुरु केली आणि त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनीही या हाणामारीत भाग घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यात पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि यानंतर वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते दुसऱ्या पेट्रोल पंपावर निघून गेले.
Read Also :
- मोदीनंतर उद्धव ठाकरे हाच एकमेव भारताला पर्याय – संजय राऊत
- फडणवीस १०० आमदार निवडून आणतात, बाळासाहेबांना ते का जमलं नाही? संजय राऊत म्हणतात…
- जितेंद्र आव्हाडांच्या खोचक शुभेच्छांना अण्णा हजारेंचे उत्तर, म्हणाले…
- ‘शिवसैनिकांचे राडे सुरूच राहिले तर…’, चंद्रकांत पाटलांचा इशारा
- शाब्बास रे वाघानो! शिवसैनिकांना भिडणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा नितेश राणेंकडून सत्कार