मुंबई : शिवसेना भवनाच्या परिसरात भाजप आणि शिवसैनिक एकमेकांना भिडल्यानंतर आता दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. या घटनेनंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनाला इशाराच दिला आहे.
शिवसैनिकांचे राडे असेच सुरू राहिले तर भाजप कार्यकर्तेही सक्षम आहेत. शिवसैनिकांना याचे परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला. अयोध्येतील राम मंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मुंबईत राडा झाल्याचं पाहायला मिळालं होते. शिवसेना भवनाच्या परिसरातच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते.
आपले राज्य आहे म्हणून शिवसेना कार्यकर्ते राडे करतील, तर त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात त्यांचे सरकार असल्याने शांतता राखण्याची जबाबदारी शिवसेनेची असल्याची जाणीव कार्यकर्त्यांना करून दिली आहे. आता हा विषय संपायला हवा असे आम्हालाही वाटते. तरीही शिवसैनिकांना असाच संघर्ष चालू ठेवायचा असेल तर भाजपाचे कार्यकर्ते सक्षम आहेत, अशा स्पष्ट शब्दात चंद्रकांत पाटलांनी इशारा दिला आहे.
दुसरीकडे, भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न करत मोर्चा काढणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा सत्कार केला आहे. राणे नावाने शिवसेना घाबरते ‘परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत’ अशी ग्वाही आमदार नितेश राणेंनी भाजपा कार्यकर्त्यांना दिली.
Read Also :
- शाब्बास रे वाघानो! शिवसैनिकांना भिडणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा नितेश राणेंकडून सत्कार
- ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन
- पुण्यात पुन्हा विकेंड लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद
- ‘पंतप्रधानांचाच वारसा जपत भाजपने पुणे महापालिकेच्या प्रॉपर्टी विकण्याचा सपाटा लावला आहे’
- ‘तो दिवस लांब नाही ज्या दिवशी शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील’