मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मुंबईत राडा झाल्याचं पाहायला मिळालं होते. शिवसेना भवनाच्या परिसरातच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वॉर सुरू झाले आहेत. आता भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न करत मोर्चा काढणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा सत्कार केला आहे.
राणे नावाने शिवसेना घाबरते ‘परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत’ अशी ग्वाही आमदार नितेश राणेंनी भाजपा कार्यकर्त्यांना दिली. शाल श्रीफळ आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्यांचा सत्कार केला.
भाजपा युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजींदर तीवाना, दक्षिण मुंबई अध्यक्ष सनी सानप, दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष अजित सिंग, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष सचिन भिलारे, मुंबई कमिटी सदस्य रोहन देसाई यांच्यासाहित 40 कार्यकर्त्यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान, भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री ठाकरेंवर देखील निशाणा साधला होता. ‘जाऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ?? मानले मुंबईतील भाजप युवा मोर्चाला’, असे ट्वीट नितेश राणे यांनी केलं होतं.
Read Also :
- ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन
- पुण्यात पुन्हा विकेंड लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद
- ‘पंतप्रधानांचाच वारसा जपत भाजपने पुणे महापालिकेच्या प्रॉपर्टी विकण्याचा सपाटा लावला आहे’
- ‘तो दिवस लांब नाही ज्या दिवशी शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील’
- ‘संपूर्ण शिवसेनाच आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार ?’