मुंबई : इंधनाचा भाव गगनाला भिडले असून, पेट्रोलने आधीच शंभरी गाठली आहे. यातच शिवसेनेच्या 55व्या वर्धापनदिनानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी भन्नाट ऑफर आणली आहे. भाजपचं ओळखपत्र दाखवणाऱ्याला मोफत पेट्रोल दिले जाणार आहे.
आज शिवसेनाचा 55वा वर्धापनदिन आहे. यानिमित्ताने भाजपचा चिमटा काढण्यासाटी हा हटके उपक्रम आमदार वैभव नाईक यांच्याकडून राबवला जात आहे. याबाबत त्यांनी ट्विटर पोस्ट देखील शेअर केली आहे.
शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल (प्रति वाहन)
आणि
भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी 1 लीटर पेट्रोल मोफत वाटप करण्यात येणार आहे. pic.twitter.com/3F8dZKkz5C
— Vaibhav Naik (@VaibhavNaikMLA) June 18, 2021
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कु़डाळ येथे सर्वसामान्यांना शंभर रुपयात 2 लिटर पेट्रोल देण्याची घोषणा केली आहे. याच बरोबर जर भाजपच्या सदस्यत्वाचे ओळखपत्र असेल तर त्या व्यक्तीला 1 लिटर पेट्रोल मोफत दिली जाणार असल्याची घोषणा सुद्धा नाईक यांनी केली आहे. सोशल मीडियावर या भन्नाट उपक्रमाची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, याआधी देखील आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने शिवसेनेने एक रुपयात एक लीटर पेट्रोल देण्याचा उपक्रम राबवला होता. याटची देखील जोरदार चर्चा झाली होती.
Read Also :
- ‘… तर जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहणार नाही’, वर्धापनदिनी सेनेचा इशारा
- राज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात
- ‘आंदोलन करायला भाजप आजही घाबरली नाही आणि उद्याही घाबरणार नाही’
- ‘शिवसैनिकांचे राडे सुरूच राहिले तर…’, चंद्रकांत पाटलांचा इशारा
- शाब्बास रे वाघानो! शिवसैनिकांना भिडणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा नितेश राणेंकडून सत्कार