सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात पाहणीसाठी दौऱ्यावर होते. यावेळी आढावा बैठकीनंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत बंद खोलीत चर्चा केली. मात्र, या चर्चेची माहिती भिडे यांनी माध्यमांना देणे टाळले.
राज्यपालांचे वागणे झालेय भाजपच्या कार्यकर्त्यासारखे; नाना पटोले यांची टीका
मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची आढावा बैठक घेतली. त्यांनतर पत्रकार परिषद घेतली. मात्र, या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी संभाजी भिडे सभागृहाच्या शेजारीच असणाऱ्या भूसंपादन कार्यालयात सुमारे तासभर प्रतीक्षा करत होते. बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी भिडे यांच्याशी त्या बंद खोलीत चर्चा केली. काही काळाच्या या चर्चेनंतर मुख्यमंत्री व भिडे खोलीतून बाहेर आले. मात्र, भिडे यांनी काय चर्चा झाली याबाबत स्पष्टीकरण देण्याचे टाळले.
राज्यपालांचे वागणे झालेय भाजपच्या कार्यकर्त्यासारखे; नाना पटोले यांची टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पूराने प्रचंड नुकसान झालेल्या भिलवडीला भेट दिली. यावेळी छोटेखानी सभा पार पडली. या सभेला ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांना सरपंचांच्या वतीने निवेदनही देण्यात आलं. कोरोनाचं संकट आणि पुराचं संकट या दोन्ही संकटाचा आपण सामना करत आहोत. त्यामुळे अशी गर्दी करू नका. कोरोनाचं संकट आणि कोसळलेलं दु:ख याची मला कल्पना आहे. तुमच्या व्यथा आणि वेदना आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सरकार तुमच्यासोबत आहे. तुमच्यासाठी जे जे करणं शक्य आहे. ते ते आम्ही करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.
Read Also :
- “मनसेसोबत भविष्यात युती होऊ शकते पण…”, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
- मुंबई विमानतळावर शिवसैनिक राडा; ‘अदानी एअरपोर्ट’ बोर्ड उखडून फेकून दिला
- भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; गणेश बीडकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – शिवसेना आक्रमक
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच भिडले शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते
- “भाजपचा अंतकाळ जवळ, कारण निष्ठवंतांना भंगारात आणि उपऱ्यांना, बाटग्यांना पालखीत नाचवलं जातंय”