मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांची स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने ‘शट अप यार कुणाल’ या पॉडकास्ट मध्ये घेतलेली मुलाखत पब्लिश झाली आहे.
या मुलाखतीत नेमकं काय झालं याची उत्सुकता अवघ्या देशाला होती ती आता संपली आहे. कुणाल कामराने कंगना रनौत, सुशांत सिंह राजपूत, भाजप यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत भाष्य केलं आहे. बुलडोझरला पद्मश्री का दिला पाहिजे याचाही मुलाखतीतून उलगडा झाला आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून कंगना रनौतची वक्तव्य चांगलीच चर्चेत होती. तिने राज्य सरकार, मुंबई पोलीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सातत्याने टीका केली होती. त्यानंतर तिच्या मुंबई महापालिकेने केलेली कारवाई चर्चेत आली होती. या कारवाई बाबत बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, कंगना अभिनेत्री आहे.
तिने म्हटलं होती की मी मुंबईत येत आहे, काय उखाडायचं उखाडा. त्यानुसार कंगनाच्या इच्छेनुसार मुंबई महापालिकेने बुलडोझर चालवून उखाडून टाकलं. त्यानुसार सामनाने वृत्तांकन केलं आणि शीर्षक ‘उखाड दिया’ असं केलं होतं. ज्या जेसीबीने हे काम केलं त्याला पद्मश्री दिलं जाणार आहे, असा मिश्किल टोलाही संजय राऊत यांनी लगावला. मुंबईत अनेक अनधिकृत बांधकामं आहेत. कंगनाचं ऑफिसचं बांधकामही अवैध होतं. कंगनावरही झालेली कारवाईही कायदेशीर आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Read Also :
असदुद्दीन ओवेसी म्हणजे दुसरे जिना, शायर मुनव्वर राणांची बोचरी टीका
मेधा कुलकर्णी भाजप सोडणार का? म्हणाल्या….
….तर राज्यात अक्षता पडायच्या आधीच नवरी पळाली, मंत्री वडेट्टीवारांचा दानवेंना टोला
नितीश कुमार यांना मिळणार मुख्यमंत्रीपद पण एनडीएच्या ‘या’ अटी आणि ही ‘नियम’ पाळावी लागणार