कोरोनमुक्त झालेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे ट्विट करून त्यांनी हि माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती मात्र आता कोरोना मुक्त झल्यावर कोरोना रुग्णांसाठी हा निर्णय घेतला आहे
दरम्यान, दोन महिन्यांत त्यांनी आपली रक्त चाचणी केली. रक्त चाचणीचे अहवाल सामान्य आल्यानंतर आव्हाड यांनी आता कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर याबाबत माहिती दिली.’मतदार संघात लोकसेवा करत असताना अचानक कोरोनाचा संसर्ग झाला. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यातून मी बराही झालो. मी माझा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेत आहे. येत्या दोन दिवसात मी रुग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान करणार आहे,’ असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी करत प्लाझ्मा दान करण्याची आपली इच्छा प्रकट केली
देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्लाझ्माची मागणीही वाढते आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त असल्याचं सिद्ध होत आहे. प्लाझ्माची मागणी लक्षात घेता दिल्लीतील Institute of Liver and Biliary Sciences (ILBS)मध्ये देशातील पहिली प्लाझ्मा बँक सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर दिल्ली सरकारने एलएनजेपी हॉस्पिटलमध्येही प्लाझ्मा बँक सुरु केली आहे. ओडिशा सरकारनेही प्लाझ्मा बँक सुरु केली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कटक येथील एसबीसी मेडिकल कॉलेजमध्ये प्लाझ्मा बँकेचे उद्घाटन केले.