म्हापसा : गोव्यात सध्या विधानसभा निवडणूक प्रचार जोरात सुरु आहे. भाजपचे म्हापसा विधानसभा मतदार संघातील उमेदवार जोशुआ डिसुझा यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेण्याचा धडाका लावला आहे. यादरम्यान, लोकांचा प्रतिसाद देखील उत्तम मिळतोय असं दिसत आहे.
भाजपामधील नाराजांना राष्ट्रवादीचे ‘रेडकार्पेट’ अन् निष्ठावंतांच्या हातावर तुरी?
दुसऱ्या बाजूला भाजपचे दिग्गज नेते देखील या मतदार संघात येऊन जोशुआ यांच्यासाठी प्रचार करत आहेत. मतदारांच्या त्यांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेण्यासोबत अनेक सामाजिक संस्थाना धार्मिक स्थळांना देखील भेटी देत असल्याचे दिसत आहे. काल या मतदारसंघात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी देखील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि पदाधिकाऱ्यांशी देखील संवाद साधला.
मोठी बातमी: नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, राणेंना जामीन मिळणार?
यानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री नाईक यांनी सांगितले की, म्हापसा मतदारसंघात जोशुआ यांना चांगला प्रतिसाद मिळत असून या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित आहे. भाजप सरकारने चांगली कामे केली असून या सत्ता आल्यानंतर सुदा म्हारसा शहर आणि इतर भागाचा विकास प्राधान्याने केला जाईल येथील नवीन सांगितले.बसस्थानकाचे उद्घाटन केले असून उर्वरित कामही पूर्ण केले त्यांनी केले असल्याचे नाईक यांनी सांगितले.
Read also:
- मायकल लोबो वैफल्यग्रस्त झाल्यानेच भाजपच्या नेत्यावर टीका करत आहेत – उर्फान मुल्ला
- पुण्यातील निवडणूकची पहिली झलक: बॅनरबाजीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा
- नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; केंद्रीय मंत्री नारायण राणे कणकवलीत दाखल
- आधी गोळ्या घातल्या, नंतर कुऱ्हाडीचे वार; शिवसेना पदाधिकाऱ्याची राहत्या घरात घुसून हत्या
- मुंबईत ट्रॅफिक जॅममुळे जोडप्यांचे घटस्फोट होतात – अमृता फडणवीस