सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर कोकणात राजकारण चांगलेच तापले होते. शिवसैनिक संतोष परब यांना निवडणुकीच्या काळात आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती असा आरोप संतोष परब आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला होता.
राष्ट्रवादीला उसणे अवसान, भाजपालाच सोनेरी दिवस : माजी सभागृह नेते एकनाथ पवार
त्यानंतर नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण निवडणूक होऊपर्यंत आमदार नितेश राणे हे अज्ञातवासात गेले होते. परवा आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. काल पुन्हा एकदा नितेश राणे थेट १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता आज जिल्हा आणि सत्र न्यायालयातील नितेश राणे आणि त्याचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. नितेश राणे यांना कोठवडीत हलवल्यानंतर लगेचच केंद्रीय मंत्री नारायण राणे हे दिल्ली दौरा आटोपून कणकवलीत दाखल झाले आहेत.
नारायण राणे हे येतानाच ज्येष्ठ वकील अॅड. सतीश माने शिंदे यांच्यासोबत आल्याने आता आज होणाऱ्या जामीन अर्जाबाबत चर्चा रंगल्या आहेत. काल राणे यांना कोठडी सुनावल्यानंतर नितेश राणेंनी तब्येतीचे कारण पुढे केले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांची संध्याकाळच्या सुमारास ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. नितेश राणेंची तब्येत ठीक नसल्याने त्यांचा मुक्काम ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात झाला आहे. आता आज नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे आणि यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळू शकते.
Read also:
- आधी गोळ्या घातल्या, नंतर कुऱ्हाडीचे वार; शिवसेना पदाधिकाऱ्याची राहत्या घरात घुसून हत्या
- मुंबईत ट्रॅफिक जॅममुळे जोडप्यांचे घटस्फोट होतात – अमृता फडणवीस
- मोठी बातमी: नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, राणेंना जामीन मिळणार?
- भाजपामधील नाराजांना राष्ट्रवादीचे ‘रेडकार्पेट’ अन् निष्ठावंतांच्या हातावर तुरी?
- म्हापशाला लवकरच ग्रीन सिटी बनविणार; भाजप उमेदवार जोशुआ डिसोझा यांची ग्वाही