पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते आज पुणे महापालिका कार्यालयात आले. पण यावेळी प्रचंड मोठा गदारोळ झाला. सोमय्या पालिका कार्यालयात आले तेव्हा त्यांच्यात आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळाला. शिवसेना कार्यकर्त्यांनी तिथे आंदोलन केलं. सोमय्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांकडून प्रचंड घोषणाबाजी झाली. विशेष म्हणजे यावेळी धक्काबुक्कीदेखील झाली. सुरक्षा रक्षकांनी मोठ्या शिताफीने सोमय्या यांना सुरक्षितपणे गाडीत बसवलं आणि तिथून बाहेर काढलं. पण यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांचा रोष प्रचंड शिगेला पोहोचलेला बघायला मिळाला.
म्हापश्यात खरी लढत डिसुझा-कांदोळकर यांच्यातच
“किरीट सोमय्या आमचे शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर गेल्या अनेक दिवसांपासून आरोप करत आहेत. त्यांच्या घरामध्ये म्हणजे पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार होतोय. तो भ्रष्टाचार आम्हाला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचा होता. त्यावर त्यांना बोलायला भाग पाडायचं होतं. त्याबाबत त्यांना निवेदन द्यायचं होतं. त्यासाठीच आम्ही गेल्या एक तासापासून इथे थांबलो होतो. ते अर्धातास उशिरा आले. आमची दिशाभूल केली गेली. ते नवीन गेटला आले असं सांगण्यात आलं. तिथून आम्ही या ठिकाणी पळत आलो. त्यांच्यासमोर निवेदन केलं. त्यांच्यासमोर पोलिसांनी आम्हाला हुसकावून लावलं. आम्हाला ढकलून दिलं. काही कार्यकर्ते त्यांच्या अंगावर पडले. पडल्यामुळे ते इथून पळून गेले. आम्ही पळून त्यांची गाडी अडवली. आम्ही रस्त्यावर झोपलो. त्यांनी आमच्या अंगावर गाडी घातली. आमची शिवसेना पूर्वी जशी काम करत होती तसंच काम करेल”, अशी भूमिका शिवसैनिकांनी मांडली.
I am attacked by Shivsena Gundas inside the premises of Pune Mahapalika@BJP4India @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 5, 2022
पुण्यात अद्याप आगामी महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलेलं नाही. पण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत शिवसेना आणि भाजप यांच्यात याआधी अनेकदा संघर्ष झालेलं बघायला मिळालं होतं. त्यानंतर संघर्षाचे हे वारे आता पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. सोमय्या यांच्यावर हा खरंतर हल्लाच आहे. शिवसैनिकांनी शर्ट काढून त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. अनेक कार्यकर्ते त्यांच्या गाडीसमोर अक्षरश: झोपले. यावेळी सोमय्या यांनी परिस्थितीचा अंदाज घेत ते देखील लवकर गाडीत शिरले. विशेष म्हणजे सुरक्षा रक्षकांनी त्यांची कामगिरी चोखपणे बजावली. अन्यथा अनपेक्षित घटना घडू शकली असती. या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये संपूर्ण घटना स्पष्टपणे दिसत आहे.
Read also:
- नितेश राणेंचा रक्तदाब वाढला, छातीचं दुखणं कायम; आता रुग्णवाहिकेने कोल्हापूरला नेणार
- पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये इयत्ता १ ते ८ वीच्या शाळा पूर्णवेळ सुरू होणार; अजित पवारांची घोषणा
- लतादीदींची प्रकृती बिघडली, श्वास घेण्यास त्रास; राज ठाकरे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- उदयनराजे भोसले अजित पवारांच्या भेटीला; पुन्हा राष्ट्रवादीत जाणार का? राजे म्हणतात…
- जबाबदारी मिळताच आशिष शेलारांकडून शिवसेनेला आव्हान; म्हणाले… लढाई आता…