मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे संजय राऊत अडचणीत आलेले असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता राऊत कुटुंबाच्याच चौकशीची मागणी केली आहे. राऊत कुटुंबातील काही सदस्यांच्या एचडीआयएलशी झालेल्या आर्थिक व्यवहाराची ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. “एचडीआयएलने पीएमसी बँकेचे 5400 कोटी रुपये ढापले आहेत. एचडीआयल आणि प्रवीण राऊत कुटुंबाचे कोट्यवधीचे आर्थिक संबंध आणि व्यवहार आहेत. तसेच प्रवीण राऊत आणि संजय राऊतांच्या कुटुंबाचेही आर्थिक संबंध आहेत. या दोन्ही राऊत कुटुंबांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. मग हा पैसा आला कुठून? या दोन्ही कुटुंबांच्या ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ची चौकशी झाली पाहिजे. पीएमसी बँकेचा पैसा एचडीआयएल मार्गे कुठून कसा गेला? याचीही चौकशी झाली पाहिजे,” असं सोमय्या म्हणाले. सोमय्या यांनी या ट्विटमधून माधुरी प्रवीण राऊत, वर्षा संजय राऊत, प्रवीण राऊत यांच्या एचडीआयएलशी झालेल्या आर्थिक व्यवहाराची, ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
"राऊत परिवार" माधुरी प्रवीण राऊत, वर्षा संजय राऊत, प्रवीण राऊत यांचे HDIL शी झालेल्या आर्थिक व्यवहाराची ' मनी ट्रेल, कॅश ट्रेल' चौकशी झालीच पाहिजे
एचडीआयएल आणि ग्रुप कंपन्यांकडून त्यांना किती रक्कम मिळाली?
एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ₹ 5400 कोटी चोरले आहे
PMC साठी हे महत्वाचे आहे pic.twitter.com/eY8rgMhVme— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 29, 2020