Kolhapur District Milk Association Gokul: Raju Shetty’s support to the ruling Mahadik group
कोल्हापूर: महाराष्ट्रात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीनंतर कोल्हापुरातील कोल्हापूर जिल्हा दूध संघ गोकुळच्या Kolhapur District Milk Association Gokul Election निवडणुकीची चर्चा जोरात आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासारखे आजी मंत्री तर आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्यासारखे माजी आमदार,खासदार गोकुळच्या रणांगणात उतरलेले आहेत. पारंपरिक वैरी असल्याने महाडिक घराणे आणि पाटील घराण्यात नेहमीप्रमाणे एका मेकांवर टीका केली जात आहे. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांची माजी खासदार धनंजय महाडिक व माजी आमदार संजय घाटगे यांनी भेट घेतली होती. Gokul Election
घाटगे आणि महाडिक यांनी सत्ताधारी गटास निवडणुकीत पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली होती, त्यानंतर राजू शेट्टी यांनी सत्ताधारी गटास पाठिंबा दिला आहे, याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. Gokul Election माजी खासदार महाडिक व माजी आमदार घाटगे यांनी शिरोळ येथे राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी बंद खोलीत काही काळ चर्चा केली होती. या चर्चेनंतर संघटनेचे प्रमुख शिलेदार सावकर मादनाईक, संघटनेचे तालुकाध्यक्ष राम शिंदे यांच्यासमवेतही चर्चा केली. सत्ताधारी राजश्री शाहू आघाडीने दूध उत्पादकांचे हित जोपासले आहे. यामुळे स्वाभिमानीच्या ठरावधारक मतदारानी सत्ताधारी पॅनेलच्या मागे राहावे, अशी आग्रही मागणी केली.Kolhapur District Milk Association Gokul Election
Gokul Election बुधवारी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली जाईल. बैठकीतील निर्णय आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांना सांगितला जाणार आहे. दरम्यान स्वामिनी संघटनेचा प्रमुख कार्यकर्त्यांचा, सत्ताधारी गटाकडे ओढा असल्याचे सांगितले जात होते. त्यानुसार शेट्टी यांनी सत्ताधारी गटास पाठिंबा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठींब्यामुळे सत्ताधारी गटात आता आनंदाचे वातावरण पसरले आहे. राजू शेट्टींमुळे आता सत्ताधारी गटाला किती फायदा होतो हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे. Kolhapur District Milk Association Gokul Election