पुणे : दर वर्षी दसरा दिवाळी मोठ्या उत्सहात साजरी केली जाते.सर्वजण यावेळी भरपूर प्रमाणात खरेदी देखील करतात. सध्या कोरोनाचे सावट जरी असले तरी व्यापाऱ्यांमध्ये त्याबाबत नियोजनाची तयारी ठीक ठिकाणी पहायला मिळते. त्याच अनुषंगाने भाजपच्या व्यापारी आघाडी आणि पुणे शहर सरचिटणीस यांनी चिनी वास्तूंविरोधात एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.
दसरा आणि दिवाळी या सणांसाठी येत्या काळात बाजारपेठांमध्ये विविध वस्तूंची विक्री सुरू होत आहे. यात चिनी बनावटीच्या वस्तू व्यापाऱ्यांनी विकण्याचे टाळावे आणि देशातील उत्पादकांच्या वस्तूंना चालना द्यावी असे निवेदन आज भाजपचे पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ॲड. मा. फत्तेचंदजी रांका यांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा पुणे शहर व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेंद्रजी व्यास हे देखील उपस्थित होते.
देशातील उत्पादनांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ची हाक दिली आहे. देशात आणि प्रामुख्याने पुण्यासारख्या शहरांमध्ये शेकडो कोटी रुपयांचे विविध वस्तू व्यवहार होतात. या वस्तू स्थानिकांनी तयार केलेल्या असतील तर आर्थिक व्यवस्थेला चालना मिळत राहील या दृष्टीने याबाबत सतत काम करणे आवश्यक आहे ही बाब लक्षात घेऊन माने यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते.
Read Also
"हे कसले हिंदुत्वाचे पुजारी ? हे तर सत्तेचे लाचारी !" CM ठाकरेंवर विरोधक बरसले https://t.co/J8L5gNImee#Cmthackarey #MahavikasAaghadi #BJP @ShelarAshish
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 13, 2020