भारतासोबतच्या सीमावादावरून चर्चेत असलेले नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली आता आपल्या अजब वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. सध्या ओली यांचे पंतप्रधान पद धोक्यात आले आहे. मात्र सत्ता वाचवणे सोडून, केपी शर्मा ओली इतर गोष्टींवर अधिक लक्ष देत असल्याचे दिसत आहे.
Real Ayodhya lies in Nepal, not in India. Lord Ram is Nepali not Indian: Nepali media quotes Nepal Prime Minister KP Sharma Oli (file pic) pic.twitter.com/k3CcN8jjGV
— ANI (@ANI) July 13, 2020
खरी अयोध्या भारतात नाही तर नेपाळमध्ये आहे. प्रभू राम भारतीय नसून नेपाळी असल्याचा, अजब दावा केपी शर्मा ओली यांनी केला आहे.
मात्र या वक्तव्यानंतर त्यांच्या देशातच आता ओली यांच्यावर टीका होत आहे. पंतप्रधानांनी असे निराधार आणि पुरावे नसलेले वक्तव्य करू नये. पंतप्रधान ओली यांना भारत आणि नेपाळचे संबंध खराब करायचे आहेत, असो दिसून येतो. मात्र असे न करता त्यांनी दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे नेपाळच्या राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे नेते आणि माजी उपपंतप्रधान कमल थापा यांनी म्हटले आहे.