सोलापुर : भाजप आपल्या भूमिकेवर ठाम असून रणजितसिंह नाईक निंबाळकरच भाजपचे उमेदवार असतील, असा पवित्रा घेतल्याने माढ्याचा तिढा आणखीच वाढला आहे. १४ एप्रिल रोजी करमाळ्याचे माजी आमदार आणि सध्या शिवसेना शिंदे गटात कार्यरत असलेले नारायण पाटील यांनी शिवसेना सोडत असल्याची भूमिका घेतली. तर करमाळ्यातील संजय मामा शिंदे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात जाऊन लोकसभेसाठी तुतारीचे काम करणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
यातच काल रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून माढा लोकसभा मतदारसंघात जबरदस्त राजकीय हालचाली घडल्या. राज्याचे लक्ष लागून असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडविण्यासाठी स्वत: शरद पवारांनी अकलुज याठिकाणी येत शिवरत्न बंगल्यावर जाऊन विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेत १४ एप्रिल रोजी राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला. यावेळी धैर्यशील मोहिते पाटलांची माढ्यासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे देखील उपस्थित होते.
हेही वाचा…“राजकारण करणारे राजकारण करत राहतील परंतु आम्ही..” सुनील तटकरेंचं मोठं विधान
यावेळी धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, शरद पवार साहेबांना का सोडून गेलो ? याचं उत्तर देण्याची गरज नाही. गेल्या ६०-६५ वर्षांमध्ये पवार साहेबांनी आणि दादांनी दोस्ती आणि ऋणानुबंध कसे जपले? हे सर्वांना माहिती आहे. महेबुब भाईंचा दुरावा का निर्माण झाला ? हेही सांगितलं. दुपारी दोस्ताने संपुर्ण राज्याने पाहिला आहे. आपण १६ तारखेला आपण पुन्हा भेटणार आहोत. असेही ते म्हणाले.
दरम्यान, एका माणसाला मला उत्तर द्यायचं आहे. आपण त्याला इथून निवडून दिला. त्याने मांडव्यात एक प्रश्न विचारला. म्हणाला ७०-७५ वर्षात जेवढा विकास झाला. तो मी पाच वर्षात केला. मी फक्त त्याला उत्तर देतो. दादांच्या सांगण्यावरून लोकांनी एका रात्रीत तुला आमदार केला. आता तुझं पार्सल एका रात्रीत माघारी बीडला पाठवायचंय. तुम्ही आमच्या कुटुंबावर तीन पिढ्या प्रेम करत आहात. सहकार महर्षी आणि विजयदादांच्या विचारांना तडा जाऊ देणार नाही. एवढा शब्द मी देतो. असेही म्हणत धैर्यशील राव मोहिते पाटलांनी राम सातपुते यांच्यावर हल्लाबोल केला.
READ ALSO :
हेही वाचा…“हेही वाचा…“तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी महायुतीचाच खासदार हवा”
हेही वाचा… मोदीजींची गॅरेंटी म्हणजे, गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी ! मुरलीधर मोहोळ
हेही वाचा..पुण्यात मोहोळांची की धंगेकरांची ताकद ? ; आगामी लोकसभा निवडणुकीबाबत पुणेकरांचं मतं काय?
हेही वाचा…नरेंद्र मोदी की राहुल गांधी, आगामी पंतप्रधानांबाबत पुणेकर नेमकं काय म्हणतात?