IMPIMP

ठाकरे सरकार डिसेंबरमध्ये पडणार, भाजप नेत्याचा दावा

अहमदनगर : महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा वारंवार समोर येत असतात. काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेबाबत जाण्यास उत्सुक नसल्याचे वक्तव्य केले होते. आता भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी ठाकरे सरकार डिसेंबरपर्यंतच राहणार, असा दावा केला आहे.

ठाकरे सरकार फार तर डिसेंबर महिन्यापर्यंतच टिकेल. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल, असे भाकीत कार्डिले यांनी वर्तविले आहे. त्यांच्या या वक्तव्यांनी आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

तसेच, आपल्या राष्ट्रवादी प्रवेशाविषयी कर्डिले म्हणाले की, मला भाजप सोडून कुठल्याही पक्षात जायचं नाही. तसेच माझ्याकडे कोणी संपर्क केला नाही आणि त्याची मला गरज नाही.