मुंबई : राज्यात यापुढे एकच शिवजयंती असावी, दोन-दोन शिवजयंती यापुढे नकोतच. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 तारखेला म्हणजेच जन्मतारखेनुसार असावी अशी मागणी खुद्द शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. त्यामुळे बुद्ध ठाकरे आपल्याच आमदारांची विनंती मान्य करणार आहेत का हा प्रश्न आहे.
नाना पटोले नौटंकीबाज, मोदी नव्हे काँग्रेसनेच देशाची माफी मागावी – देवेंद्र फडणवीस
छत्रपती शिवाजी महाराज लोकोत्तर युगपुरुष होते, शककर्ते होते. त्यांची तुलना इतर राष्ट्रीय नेत्यांशी होऊ शकत नाही. त्यांची जयंती पंचांगातील तिथीनुसार दरवर्षी फाल्गुन कृष्ण तृतीयेलाच साजरी होईल. तसा आदेश खुद्द शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांना दिला. आणि शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती तिथीनुसार साजरे करू लागले. पुढे कालांतरानं दोन- दोन शिवजयंतीचा वाद समोर आला पण बाळासाहेब ठाकरे यांनी माघार घेतली नाही. मात्र त्यांचेच सैनिक आता म्हणताय की महाराष्ट्रात एकच शिवजयंती हवी आणि ती तिथीनुसार नाहीतर तारखेनुसार व्हावी.
तोंड दाबलेलं, हात पकडलेले; अशा अवस्थेत अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन जयंती साजरी करण्यासाठी वेगवेगळ्या मराठा संघटनांनी विरोध होत होता. एक राजा एक जयंती साजरी करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती की शिवजयंती ही तिथी नुसार साजरी करावी. आता शिवसेनेच्या आमदारांकडूनच तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला विरोध होतो आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमदारांचं ऐकणार की वडिलांच्या भूमिकेवर ठाम राहणार याचे उत्तर मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर महाराष्ट्राला मिळेल. मात्र आमदारांनीच थेट एकच शिवजयंतीची भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांची कोंडी केली आहे हे मात्र निश्चित.
Read also:
- शिवसेना-भाजपची पुन्हा युती; ‘या’ नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला शिकवला धडा
- पुण्यातील लोकांना माहित आहे… अजित पवारांचे नाव न घेता चंद्रकांत पाटलांनी हाणला उपरोधिक टोला
- शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश जारी; काय आहेत नियम… वाचा सविस्तर…
- चर्चा तर होणारच.! राज ठाकरेंच्या नावापुढे चक्क हिंदुह्रदयसम्राच, घाटकोपरमध्ये भलमोठं बॅनर
- संभाजीराजेंचा पुन्हा एल्गार; ‘या’ तारखेपासून करणार आमरण उपोषण