मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आता हिंदुहृदयसम्राट म्हणून संबोधले जाऊ लागले आहे. मुंबईतील घाटकोपरमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. राज ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे. राज यांच्या स्वागतासाठी मुंबईतील घाटकोपर आणि चेंबूर परिसरात पदाधिकाऱ्यांनी भलेमोठे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर राज ठाकरे यांच्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केला आहे. या बॅनरची जोरदार चर्चा मुंबईत होत आहे.
तुम्हाला आंदोलन करता येणार नाही; नाना पटोलेंना पोलिसांनी अडवलं
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिनसैनिक हिंदूहृदयसम्राट म्हणून संबोधतात. आता मनसेनेही हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतला असून, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील घाटकोपरमध्ये मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन होत आहे.
सगळ्यांना माहित आहे की पाठीत खंजीर कोणी खुपसला; देवेंद्र फडणवीसांच आदित्य ठाकरेंना प्रत्यूत्तर
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. राज ठाकरे यांच्या स्वागताचे भलेमोठे बॅनर मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपर, चेंबूर परिसरात लावले आहेत. यात राज ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना, आता मनसेने हिंदुत्वचा मुद्दा हाती घेतलाच होता, त्यातच थेट राज ठाकरे हे हिंदुहृदयसम्राट असल्याचा उल्लेख केलेले बॅनर झळकल्याने त्याची जोरदार चर्चा मुंबईत सुरू आहे.
Read also:
- संभाजीराजेंचा पुन्हा एल्गार; ‘या’ तारखेपासून करणार आमरण उपोषण
तोंड दाबलेलं, हात पकडलेले; अशा अवस्थेत अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात - नाना पटोले नौटंकीबाज, मोदी नव्हे काँग्रेसनेच देशाची माफी मागावी – देवेंद्र फडणवीस
- कोकणात जोरदार राडा; भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
- महाराष्ट्राचे राजकारण हलवून देणारी पत्रकार परिषद उद्या होणार; संजय राऊतांचा भाजपा विरुद्ध एल्गार