मुंबई : आगामी काळात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात संघर्ष वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रात भाऊ-भाऊ म्हणून राहत असणारे हे भाऊ आता एकमेकांच्या विरोधात ठाकले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सकाळी सकाळी आज पत्रकारपरिषदेत खळबळजनक खुलासे करण्याचे आव्हान सर्वांना दिले आहे.
मोठी बातमी: बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा, काय आहे नेमकं प्रकरण…
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. ईडीकडून काही नेत्यांच्या चौकशी सुरु आहे, धाडी टाकल्या जात आहेत. यावर आता शिवसेनेचा संयम तुटला आहे असं संजय राऊत यांनी आज जाहीर केलं आहे.
संजय राऊत मानसिक रुग्णतेच्या पर्मोच्च स्थानावर; आशिष शेलारांची राऊतांवर बोचरी टीका
आता उद्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी पत्रकार परिषद संजय राऊत घेणार आहेत. त्यांनी आज पत्रकारपरिषदेत उद्या घेतल्या जाणाऱ्या पिक्चरचा ट्रेलर दिला आहे. उद्या शिवसेना भवनात ४ वाजता ही परिषद होणार आहे. घोटाळे कोणी केले ? कसे केले ? आणि भारतीय जनता पक्षाचे कोणते नेते यामध्ये समाविष्ट आहेत ? हे उद्या संजय राऊत सांगणार आहेत.
किरीट सोमय्यांच्या सत्काराला महापालिकेने परवानगी नाकारली; भाजप सत्कार करण्यावर ठाम
उद्या संपूर्ण देश आमचं ऐकेल. आम्ही खूप सहन केलं. आणि आता आम्हीच तुम्हाला बरबाद करणार आहे . त्यांची दादागिरी सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणा, केंद्र सरकारकडून शिवसेना, ठाकरे परिवारावर खोट्या आरोपांचा चिखल उडवला जात आहे. त्याला उद्या उत्तर मिळेल, असा सूचक इशारा राऊत यांनी दिला. पुढील काही दिवसांत भाजपचे साडे तीन लोकं अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर येतील. महाराष्ट्रातही सरकार आहे, हे लक्षात घ्या. हे सरकार शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आहे, हेही लक्षात घ्या. सरकार हे सरकार असतं. कोणात किती दम आहे ते पाहू. त्यांचा बंदोबस्त सुरू आहे, असा इशारा राऊतांनी दिला.
Read also:
- सगळ्यांना माहित आहे की पाठीत खंजीर कोणी खुपसला; देवेंद्र फडणवीसांच आदित्य ठाकरेंना प्रत्यूत्तर
- तुम्हाला आंदोलन करता येणार नाही; नाना पटोलेंना पोलिसांनी अडवलं
- महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी समाज का ठरवू शकत नाही? जितेंद्र आव्हाड
- संजय राऊतांच्या मुलीच्या लग्नात झालेल्या खर्चाची बिले दिली कोणी? किरीट सोमय्यांचा संतप्त सवाल
- ‘पॉलिटिकल महाराष्ट्र’चे वृत्त ठरले खरे; माजी महापौर योगेश बहल पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे निवडणूक प्रभारी