मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला आहे. पर्यावरण आदित्य ठाकरे हे नेहमीच टीकांपासून चार हात लांब राहत असतात. मात्र गोवा विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ त्यांनी भाषण करत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला लढवला.
मोठी बातमी: बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा, काय आहे नेमकं प्रकरण…
अनेक वर्षांपासून आम्ही भारतीय जनता पक्षाचं नुकसान होऊ नये यासाठी बाहेर राज्यात कधी उमेदवार देत नव्हतो. जेव्हा स्वर्गीय बाळासाहेब होते तेव्हा भाजपशी युती करताना ते म्हणायचे की कुठेही आपल्या मित्राला धोका निर्माण व्हायला नको.
मोठी बातमी: बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा, काय आहे नेमकं प्रकरण…
त्यांना मदत म्हणून शिवसेना इतर राज्यात कधीही लढली नाही. गेल्या ५ वर्षांत आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. एनडीएमधल्या इतर पक्षांच्या पाठीत देखील खंजीर खुपसला गेला,अशी सणसणीत टीका आदित्य ठाकरेंनी भाजपवर केली होती. आता आदित्य ठाकरेंच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. तुमच्या सगळ्या लोकांनी मोदींचा फोटो लावून मत मागितली. त्यानंतर केवळ आणि केवळ मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही युती धर्म पाळला नाही.
संजय राऊत मानसिक रुग्णतेच्या पर्मोच्च स्थानावर; आशिष शेलारांची राऊतांवर बोचरी टीका
भाजपाच्या स्टेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोदींनी घोषणा केली भाजपाच्या मुख्यमंत्र्यांची. त्याला तुम्ही समर्थन दिलं आणि नंतर मुख्यमंत्री निवडीच्या वेळी दगा केला. त्यामुळे राज्याच्या जनतेला नीट माहिती आहे की कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना हाणला आहे. एवढंच नाही तर उत्तर प्रदेशात राम जन्मभूमीच्या आंदोलनानंतर शिवसेना २०० जागा लढले होते. एका जागेवर देखील डिपॉझिट वाचवू शकले नाहीत. उलट मित्रपक्ष असूनही भाजपाला जिथे जिथे नुकसान पोहोचवता येईल तो प्रत्येक वेळी प्रयत्न शिवसेनेने केला. पण ते कधीही यशस्वी झाले नाहीत, असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला आहे.
Read also:
- तुम्हाला आंदोलन करता येणार नाही; नाना पटोलेंना पोलिसांनी अडवलं
- महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी समाज का ठरवू शकत नाही? जितेंद्र आव्हाड
- संजय राऊतांच्या मुलीच्या लग्नात झालेल्या खर्चाची बिले दिली कोणी? किरीट सोमय्यांचा संतप्त सवाल
- ‘पॉलिटिकल महाराष्ट्र’चे वृत्त ठरले खरे; माजी महापौर योगेश बहल पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे निवडणूक प्रभारी
- किरीट सोमय्यांच्या सत्काराला महापालिकेने परवानगी नाकारली; भाजप सत्कार करण्यावर ठाम