पुणे : गेल्या आठवड्यात पुणे महानगरपालिकेच्या इमारतीत किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की झाली होती. यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही शिवसैनिकांना अटक केली आहे. याच प्रकरणी सोमय्यांचा पुणे महापालिकेत सत्कार करण्यात येणार होता. परंतू, पुणे महापालिका आवारात सोमय्या यांच्या सत्काराला पुणे महापालिकेने परवानगी नाकारली आहे. परवानगी नसली तरी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सत्कार करणारच असल्याची आक्रमक भूमिका पुणे शहर भाजपने घेतली आहे.
‘पुढे चला मुंबई’; मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची टॅगलाईन ठरली
आज दुपारी किरीट सोमय्या यांना पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायऱ्यावर रोखण्यात आलं होतं त्याच पायऱ्यावर आज त्यांचा पुणे शहर भाजपच्या वतीने सत्कार केला जाणार होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाई होणारच आज जो पोलीस बंदोबस्त होता,त्यादिवशी मात्र सर्व पळून गेले होते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हिशोब द्यावा लागेल. उद्धव ठाकरेंनी मला मारण्यासाठी 100 गुंड पाठवले होते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाई होणारच पवार आणि ठाकरे यांनी पैसे खाल्लेत संजय राऊतांनी जे पैसे खर्च केलेत. त्याचा हिशोब तर द्यावा लागेल, त्यांचा आणि पाटकर यांचा संबध काय ते त्यांनी जाहीर करावं, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
जोशुआ हे वडिलांप्रमाणेच देश, राज्याचा प्रथम विचार करणारे; आरएसएस डिसुझाच्या पाठीमागे ठामपणे उभा
उद्धव ठाकरेंनी ज्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं, त्या कंपनीवर पुणे पोलिसांनी पीएमआरडीए का कारवाई केली नाही. संजय राऊतांच्या मित्र या कंपनीत पाटनर आहे म्हणून कारवाई केली नाही. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या मदतीने कोविड सेंटरमध्ये भष्ट्राचार करून लोकांच्या जीवाशी खेळ करण्याचे पाप केलं. संजय राऊतांना एवढी मस्ती आहे लोकांच्या जीवाशी खेळ करण्याचा. उद्धव ठाकरेंनी हे सर्व घडवलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवसेनेच्या 100 गुंड महापालिकेला सुट्टी असताना पाठवलेत. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे वाधवा प्रकरणात सुटलेत, मात्र आता सुटणार नाहीत, कारवाई होणार आहे.
Read also:
- संजय राऊत मानसिक रुग्णतेच्या पर्मोच्च स्थानावर; आशिष शेलारांची राऊतांवर बोचरी टीका
- मोठी बातमी: बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा, काय आहे नेमकं प्रकरण…
- लढा एसटी विलिनीकरणाचा; अहवाल सादर करण्यास आठवडाभर मुदवाढ
- यापुढे सिंधुदुर्गात दहशत चालणार नाही; वैभव नाईकांचा राणेंना कडक शब्दात इशारा
- ” तू योद्धा महान है ” नितेश राणेंच्या मुंबईतील बॅनरने शिवसेनेला पुन्हा डिवचले