म्हापसा : गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहचला असून आता प्रचार रंगात आला आहे. भाजप , काँग्रेस , आणि नव्याने गोव्यात दाखल झालेल्या आप आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांत खरी लढत पाहायला मिळत आहे. यातच म्हापसा मतदार संघातील आमदार जोशुआ डिसुझा विरुद्ध सुधीर कांदोळकर ही लढतीची सध्या बरीच चर्चा होताना दिसून येत आहे.
नितेश राणेंची प्रकृती आणखी बिघडली; संध्याकाळी होणार सिटी अँजिओग्राफी
या मतदारसंघात ख्रिचन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जोशुआ डिसुझा यांना भाजपने यावेळी तिकीट दिले असून केवळ भाजपच नव्हे तर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक देखील डिसुझा यांच्यासाठी यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे दिसत आहे. जोशुआ हे वडिलांप्रमाणेच देशाचा, राज्याचा आणि पक्षाचा प्रथम विचार करणारे आहेत सोबतच ते राष्ट्रवादी विचारधारेला मानणारे असल्यानेच संघ त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहे.
किरीट सोमय्यांवर सूड उगवला गेलाय, आम्ही सहजासहजी घेणार नाही – चंद्रकांत पाटील
याशिवाय महत्वाचे म्हणजे जोशुआ यांचे अनेक निकटवर्तीय आणि मार्गदर्शक हे संघाशी संबधित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात ज्यावेळी काही धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ येईल त्यावेळी अल्पसंख्याक समाजासोबत बहुसंख्य समाजाचा देखील १०० % विचार होईल अशी लोकांमध्ये चर्चा आहे.
मोठी बातमी: राज्यातील १० महापालिकेच्या निवडणूका पुढे जाणार? मार्च-एप्रिल ऐवजी जुन-जुलैमध्ये?
दुसऱ्या बाजूला सुधीर कांदोळकर हे आगोदर भाजपमध्ये होते मात्र वैचारिक गोंधळ आणि पद मिळवण्याची लालसा यातून त्यांनी थेट विरोधी विचारसरणी असणाऱ्या कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सध्या कांदोळकर यांच्याभोवती कथित पुरोगामी असणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांचा गराडा आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचे वैचारिक अधिष्ठान नसलेल्या माजी मंत्री मायकल लोबो यांच्या छत्रछायेत ते निवडणूक लढवत आहेत. यामुळेच पुढे जाऊन कदाचित ते आमदार झालेच तर या मतदारसंघात बहुसंख्य असणाऱ्या समाजाच्या विरोधातील निर्णय घेतले जातील अशी भीती काहींनी व्यक्त केली आहे.
हिंगणघाट जळीतकांड प्रकरण: तरुणीला जिवंत जाळणाऱ्या नराधमाला अखेर जन्मठेपेची शिक्षा
दरम्यान, कॉंग्रेसवर नेहमीच हिंदू विरोधी असल्याचा आणि अल्पसंख्याक समाजाचे तुष्टीकरण केल्याचा आरोप होत असतो. पक्षाची अनेक धोरणे ही त्याच पद्धतीची आहेत त्यामुळे उद्या कांदोळकर जर आमदार झाले तर त्यांना देखील पक्षाच्या ध्येय धोरणांना फॉलो करावे लागणार हे क्रमप्राप्त आहे. आता या सर्व बाबींचा विचार करून म्हापसा मतदार संघातील जनता नेमकं कुणाच्या पारड्यात आपले बहुमूल्य मत टाकणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.
Read also:
- ‘पुढे चला मुंबई’; मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची टॅगलाईन ठरली
- ठाकरे-पवारांचा मुंबईत सकाळी सकाळी वजनदार दौरा; मिशन मुंबईची जोरदार तयारी
- गोव्यात काँग्रेस नेते फक्त पर्यटनासाठीच यायचे – मोदी
- नुसती उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नका; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला
- ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेक लोकांचा बीपी वाढेल; नितेश राणेंचा हल्लाबोल