पुणे : भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या चांगलाच संघर्ष सुरु आहे. आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमैया हे शिवसेना नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुण्यात आले होते.
मजबूत भाजपसाठी जोशुआंना पाठबळ द्या; अभिनेता किशन कुमार यांचे आवाहन
यामध्ये शिवसैनिक आणि किरीट सोमैया यांच्यात झटपट झाली आणि त्यांना चांगलाच मार लागला. सध्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे असल्याने त्यांच्यावरही भाजपच्या नेत्यांकडून टीका करण्यात आली. काल पत्रकारपरिषदेत बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली म्हटले की हेलिकॉप्टरमधून ते फक्त जमिनी बघायचे काम करतात. या वक्तव्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलेच खरमरीत उत्तर दिले आहे. जेव्हा एखादा मंत्री किंवा पालकमंत्री असेल तो जर हेलिकॉप्टरने प्रवास करत असेल तर हेलिकॉप्टरने फिरायला परवानगी घ्यावी लागते, किती प्रवासी असतात, त्यांची माहिती द्यावी लागते.
महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीची पिंपरी-चिंचवडमध्ये ‘त्रिसूत्री’
जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे यांचा त्याबाबतचा रोकोर्ड असतो. चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांनी मागील सरकारमध्ये जबाबदारीने काम पाहिलेलं आहे. मी हेलिकॉप्टरमधून जमिनी बघत असतो, असा आरोप ते करत आहेत तर त्याचे पुरावे त्यांनी द्यावेत. बिनबुडाचे आरोप करणे चुकीचे आहे. ते त्यांनी बंद करावे. नुसतं उचलली जीभ लावली टाळ्याला असं काही त्यांनी करू नये असं आव्हानही अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना दिलं आहे. लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण, हे किती गांभीर्याने घ्यावे, हे जनता ठरवेल. मी माझे काम करत आहे आणि तुम्ही तुमचं करा असा उपरोधिक सल्ला देखील चंद्रकांत पाटलांना दिला आहे.
Read also:
- ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेक लोकांचा बीपी वाढेल; नितेश राणेंचा हल्लाबोल
- हिंगणघाट जळीतकांड प्रकरण: तरुणीला जिवंत जाळणाऱ्या नराधमाला अखेर जन्मठेपेची शिक्षा
- मोठी बातमी: राज्यातील १० महापालिकेच्या निवडणूका पुढे जाणार? मार्च-एप्रिल ऐवजी जुन-जुलैमध्ये?
- किरीट सोमय्यांवर सूड उगवला गेलाय, आम्ही सहजासहजी घेणार नाही – चंद्रकांत पाटील
- अटक करुन जेलमध्ये टाका, असे मुख्यमंत्र्यांचे आदेश; आमदार रवी राणांचा गंभीर आरोप