– भोसरीत अजित गव्हाणे, पिंपरीत सीमा सावळे आणि चिंचवडमध्ये राहुल कलाटे
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्रिसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत शहरातील भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या तीन विधानसभा मतदार संघाची जबाबदारी २०२४ मधील संभाव्य उमेदवारांकडे देण्यात येणार आहे, अशी खात्रीलायक माहिती आहे.
पंतप्रधान मोदींची आज म्हापश्यात जाहीर सभा; भाजपकडून जंगी तयारी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी शहर संघटनेत बदल करण्याचे निश्चित केले आहे. आगामी दोन-तीन दिवसांमध्ये शहराध्यक्षपदी भोसरीतील ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांना जबाबदारी देण्यात येणार आहे. महिला शहराध्यक्षपदी भोसरीतीलच कविता आल्हाट यांना संधी मिळणार आहे.
‘लांडेवाडीच्या घाटात या’ मग बघू कोण कोण बसतंय घोडीवर? शिवाजीराव आढळरावांचे कोल्हेंना खुले आव्हान
महापालिका निवडणूक २०२२ मध्ये होणार असली, तरी शहराध्यक्षपद आणि अन्य जबाबदाऱ्या या २०२४ ची विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून देण्यात येणार आहेत. भोसरीतून अजित गव्हाणे यांना विधानसभा निवडणुकीचा संभाव्य प्रभवी चेहरा म्हणून व्यासपीठ मिळावे. याकरिता शहराध्यक्षपदावर संधी देण्यात येणार आहे. त्याद्वारे महापालिका पालिका निवडणुकीत भोसरी मतदार संघातील प्रभाग रचना आणि उमेदवार निश्चितीमध्ये गव्हाणे यांना झुकते माप दिले आहे.
तुम्ही मुंबईचे दादा मातोश्रीपुरतेच आहात; नारायण राणेंचा संजय राऊतांना खोचक टोला
भाजपातील ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे या भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर नाराज आहेत. त्यामुळे सावळ पाच ते सहा नगरसेवक घेवून राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. अजित गव्हाणे यांच्या पदाची घोषणा होताच भाजपाला खिंडार पाडण्याची रणनिती आहे. विशेष म्हणजे, पिंपरी विधानसभा मतदार संघातून २०२४ मध्ये साळवे यांना उदेवारी देण्याचे आश्वासन घेतल्यानंतरच सावळे यांनी प्रवेशाबाबत होकार दिल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार, पिंपरी मतदार सघांतील प्रभाग रचना आणि उमदेवार निश्चितीमध्ये सावळे यांना विश्वासात घेवून राष्ट्रवादी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
एकनाथ शिंदेचा वाढदिनीच भाजपला जोरदार धक्का; भाजपच्या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शिवसेना गटेनते राहुल कलाटे यांचा आधार घेतला आहे. चिंचवडमधील प्रभाग रचना करताना कलाटे निर्णायक भूमिकेत होते. कलाटे आणि राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींमध्ये चर्चा झाली असून, २०२४ मध्ये आमदार जगताप यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी कलाटेंना ताकद दिली जात आहे.
लांडे, बनसोडे, शिलवंत, काटे अस्वस्थ…
भोसरी मतदार संघात अजित गव्हाणे यांचा पत्ता बाहेर काढल्यामुळे माजी आमदार विलास लांडे यांना विधानसभा राजकारणातून निवृत्ती घ्यावी लागणार आहे. पिंपरीतून सीमा सावळे यांना ताकद दिल्यामुळे विद्ममान आमदार अण्णा बनसोडे आणि इच्छुक उमेदवार सुलक्षणा शिलवंत-धर यांचा पत्ता कट होणार आहे. तसेच, चिंचवडमधून राहुल कलाटे यांची ‘एन्ट्री’ निश्चित असल्यामुळे नाना काटे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे अशा २०२४ मधील संभाव्य इच्छुकांचा भ्रमनिरास होणार आहे. त्यामुळे ‘गव्हाणे, सावळे आणि कलाटे’ या त्रिसूत्री कार्यक्रमामुळे राष्ट्रवादीत गृहकलह उफाळून येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
Read also:
- मजबूत भाजपसाठी जोशुआंना पाठबळ द्या; अभिनेता किशन कुमार यांचे आवाहन
- अमरावतीत आयुक्तांच्या अंगावर शाईफेक प्रकरणी; आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल
- पंतप्रधान मोदींची आज म्हापश्यात जाहीर सभा; भाजपकडून जंगी तयारी
- नागपूरात नितीन गडकरींच्या घराबाहेर आंदोलन; भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा
- मुंबईत शिवसेनाच दादा आहे, टीका करायचं काही कारण नाही; संजय राऊतांनी पुन्हा ठणकावलं