अमरावती : अमरावतीमध्ये सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून चांगलाच राजकीय वाद निर्माण झाला आहे. अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गात सांडपाणी साचत असल्याच्या माहितीवरून पाहणीसाठी आलेल्या आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार बुधवारी घडला होता.
नितेश राणेंची प्रकृती आणखी बिघडली; संध्याकाळी होणार सिटी अँजिओग्राफी
यानंतर शहरात देखील वातावरण चिघळले आहे. काल याच शाईफेकीचे पडसाद अमरावती महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळाले. आज देखील अग्निशमन दल वगळता सर्व कार्यालयांमध्ये कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत ५ जणांना अटक केली आहे. एवढंच नाही तर काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रवी राणा यांच्यावर आणि त्यांच्या अन्य ११ कार्यकर्त्यांवर कलम ३०७ नुसार हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप केला गेला आहे.
मुंबई महापालिकेवर 7 मार्चनंतर प्रशासक नेमणार; राज्य सरकारचा निर्णय
याबाबत आमदार रवी राणांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रवी राणा यांनी म्हटलं आहे की ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राजकारण केलं गेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. दस्तुरखुद्द महापालिका, पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देऊन त्या ठिकाणी पुतळा बसवू न देण्यासाठी प्रयत्न केला.
‘लांडेवाडीच्या घाटात या’ मग बघू कोण कोण बसतंय घोडीवर? शिवाजीराव आढळरावांचे कोल्हेंना खुले आव्हान
प्रशासनावरही दबाव आण्यात आला होता. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे शिवप्रेमींनी आयुक्तांवर शाई फेकली. मला काही पोलिस व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. राजकीय सूडबुद्धीने मला अडकविण्याचा प्रयत्न होत आहे. आणि माझ्याविरोधात सुईचादेखील कुठे पुरावा मिळत नाही, पण ३०७ चा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं देखील रवि राणा यांनी म्हटलं आहे.
Read also:
- पंतप्रधान मोदींची आज म्हापश्यात जाहीर सभा; भाजपकडून जंगी तयारी
- नागपूरात नितीन गडकरींच्या घराबाहेर आंदोलन; भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा
- मुंबईत शिवसेनाच दादा आहे, टीका करायचं काही कारण नाही; संजय राऊतांनी पुन्हा ठणकावलं
- एकनाथ शिंदेचा वाढदिनीच भाजपला जोरदार धक्का; भाजपच्या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
- तुम्ही मुंबईचे दादा मातोश्रीपुरतेच आहात; नारायण राणेंचा संजय राऊतांना खोचक टोला