ठाणे : शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा काल वाढदिवस होता. मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील वजनदार नेते असल्याने त्यांच्या वाढदिवसाची चर्चा देखील मोठी झाली होती. गेल्या कित्येक दिवसांपासून भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंना पक्षात आण्यासाठी उत्सुक आहे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे असतील किंवा इतरही बड्या नेत्यांनी हा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार अशी २०१९ सालच्या विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर काहींनी हाक दिली होती.
त्यावेळी देखील त्यांचे बॅनर्स वगैरे लावण्यात आले होते. काल वाढदिवसानिमित्त देखील काही कार्यकर्त्यांनी त्यांचा बॅनरवर उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर तो बॅनर हटवण्यात आला होता. शिवसेनेच्या गोटात काहीशी खळबळ या बॅनरमुळे पाहायला मिळाली होती.
#कल्याण येथील भाजपा चे माजी नगरसेवक विशाल पावशे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधून घेत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यासमयी शिवसेनेत स्वागत करून पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी खासदार @DrSEShinde उपस्थित होते. pic.twitter.com/RTtxOAlWLD
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 9, 2022
मात्र एकनाथ शिंदेनी आपण कट्टर शिवसैनिक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे आणि भाजपला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी धक्का दिला आहे. एकनाथ शिंदेनी वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमात भाजपच्या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये भाजपच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेनी आपल्या धक्का तंत्राचा वापर करून भाजपला धक्का देत आणखी एक नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व प्रवेश झाल्याने आता शिवसेनेचे राजकीय बलाबल वाढणार आहे.
Read also:
- तुम्ही मुंबईचे दादा मातोश्रीपुरतेच आहात; नारायण राणेंचा संजय राऊतांना खोचक टोला
- ‘लांडेवाडीच्या घाटात या’ मग बघू कोण कोण बसतंय घोडीवर? शिवाजीराव आढळरावांचे कोल्हेंना खुले आव्हान
- मुंबई महापालिकेवर 7 मार्चनंतर प्रशासक नेमणार; राज्य सरकारचा निर्णय
- नितेश राणेंची प्रकृती आणखी बिघडली; संध्याकाळी होणार सिटी अँजिओग्राफी
- अण्णा हजारेन बेमुदत उपोषणाच अस्त्र उगारलं; ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाविरोधात उतरणार मैदानात