अमरावती : अमरावतीमध्ये राजापेठ उड्डाणपूल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढल्यामुळे स्वतःला शिवप्रेमी म्हणवणाऱ्यांनी आज मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाही फेकली आणि निषेध व्यक्त केला. दरम्यान शाई फेकणारे नेमकं कोण होते. याची माहिती अद्याप कळली नाही.
म्हापशात काँग्रेसचा ‘रात्रीस खेळ चाले’; स्वाभिमानी मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ?
12 जानेवारीला आमदार रवी राणा यांनी महापालिकेच्या परवानगीशिवाय राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. या पुतळ्यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. त्यानंतर रातोरात शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोलपंप चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला.
पुण्यात प्रभावरचनेवरून राष्ट्रवादीत चलबिचल; प्रमुखांनी आमचा विचारच केला नसल्याची दबक्या आवाजात चर्चा
दरम्यान रवी राणा यांच्याकडून बसवण्यात आलेला पुतळा महापालिकेनं हटवला आहे. दरम्यान त्या रात्रीच पोलीस फौजफाट्यासह महापालिकेचं पथक राजापेठ उड्डाणपुलावर दाखल झालं होतं. तर शिवसेनेनं दर्यापूरमध्ये बसवलेल्या पुतळ्याच्या ठिकाणीही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसंच पोलिसांनी शिवसेना तालुकाप्रमुखासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी रवी राणा यांनी काही दिवसापूर्वी महापालिकेत केली होती, पुतळ्यावरून जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले असून यात शिवप्रतिष्ठानने सुद्धा उडी घेतल्याचे समजते.
माहितीनुसार राजपेठ उड्डाणपुलच्या खालच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याची माहिती मनपा आयुक्तांना देण्यात आली होती. त्यानुसार अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. पाहणी करताना काही अज्ञातांनी त्यांच्यावर शाईफेक केली. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण त्यावेळी अज्ञातांनी मोठ्या प्रमाणात मनपा आयुक्तांवर शाईफेक करून तिथून पळ काढला. दरम्यान आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे. सगळे वरिष्ठ अधिकारी उपस्थित झाले असून नेमके शाईफेक करणारे कोण होते? याचा तपास केला जात आहे.
Read also:
- मोठी बातमी: नितेश राणेंना मोठा दिलासा, जिल्हा सत्र न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर
- माझा राजकीय खुन करण्याचा प्रयत्न; मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
- ‘भाजपसोबत जनशक्ती असल्याचे कांदोळकरांच्या लक्षात आल्याने आता ते धनशक्तीचा वापर करत आहेत’
- राज्यातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव; संजय राऊतांचे व्यंकय्या नायडूंना पत्र
- धनंजय महाडिक, पुत्र विश्वजीत महाडिक पुन्हा सक्रिय; आगामी काळात मोहोळ तालुक्यात एकहाती सत्तेसाठी उतरले मैदानात