कोल्हापूर : कोल्हापुरात सध्या महविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाला सलग तीन निवडणुकांमध्ये जोरदार धक्के दिले. गोकुळ, जिल्हा बँक आणि विधानपरिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपला वरचष्मा दाखवला आहे. यामाध्ये पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचं नाव प्रखरतेने समोर आलं आहे.
राष्ट्रवादी- शिवसेना आमने-सामने; अजित पवारांच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांचा कडाडून विरोध
दुसरीकडे बंटी पाटलांचे पारंपारिक विरोधक माजी खासदार धनंजय महाडिक हे आता चांगलेच सक्रिय झालेले पाहायला मिळत आहे. महाडिकांचा मागील काही काळातील निवडणुकांमध्ये बंटी पाटलांनी पराभव केल्याने ते आतापासून आगामी निवडणुकांसाठी मैदानात उतरले आहे. मोहोळ तालुक्यात आगामी निवडणुकांमध्ये पूर्ण सत्ता स्थापन करण्याच्या इराद्याने भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय उर्फ मुन्ना महाडिक आणि त्याचे चिरंजीव विश्व्जीत महाडिक हे पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत.
शिवाजी पार्क हे शिवाजी पार्क राहू द्या, त्याची स्मशानभूमी करू नका – प्रकाश आंबेडकर
मोहोळ तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन-उद्घाटनांच्या निमित्ताने धनंजय महाडिक प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावत आहेत. ज्या ठिकाणी महाडिकांना येणे शक्य नाही, अशा ठिकाणी त्यांचे चिरंजीव विश्वजीत महाडिक हे हजेरी लावत आहेत. महाडिक पिता-पुत्रांच्या सक्रियतेमुळे आता मोहोळ तालुक्यातील महाडिक गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत आधीच मारामारी; त्यात कशी निभावेल भाजपातील नाराजांची शिरजोरी?
मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा साखर कारखान्यावर आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय महाडिक यांनी येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या भाजपच्या चिन्हावर समविचारींना सोबत घेऊन लढविणार आहोत असं म्हटलं आहे. आपापसातील मतभेद विसरून विरोधकांचा सुपडा साफ करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. सध्या पूर्ण क्षमतेने सुरु असलेला ’भीमा’ साखर कारखान्याचा गळीत हंगाम, शेतकरी, कामगार, ऊस पुरवठादार यांचे दिलेले पैसे, कुठलेही राजकारण न करता सुरू असलेले गाळप, या सर्व कारणांमुळे अध्यक्ष महाडिक व भीमा परिवाराच्या मोठ्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपचाच झेंडा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Read also:
- २०२४ला औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरेच होणार; रावसाहेब दानवेंना धक्का देत सत्तरांची सोयगावात जोरदार बॅटिंग
- पुण्यात प्रभावरचनेवरून राष्ट्रवादीत चलबिचल; प्रमुखांनी आमचा विचारच केला नसल्याची दबक्या आवाजात चर्चा
- म्हापशात काँग्रेसचा ‘रात्रीस खेळ चाले’; स्वाभिमानी मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ?
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; उद्यापासून मिळणार ऑनलाईन हॉलतिकीट
- आपल्या विचारांतून आपले संस्कार आणि संस्कृती दिसते; रुपाली चाकणकरांचा अमृता फडणवीसांना टोला