औरंगाबाद : महाराष्ट्रात मागील काही दिवसांमध्ये नगरपंचायत निवडणुकांचा निकाल लागला होता ज्यामध्ये भाजपने सर्वात जास्त जागा मिळवत क्रमांक एकच पक्ष म्हणून विजय मिळवला होता. मात्र काही ठिकाणी भाजपचे बालेकिल्ले नेस्तनाबूत करण्यात आले होते. यामध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना चांगलेच धक्के देण्यात आले होते.
एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री; ठाण्यातील कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरबाजीची राज्यभर चर्चा
रावसाहेब दानवेंचे होम ग्राउंड असलेल्या सोयगाव नागरपंचायतीवर शिवसेनेने आपला भगवा झेंडा फडकवला आहे. सेनेत मागील काळात राज्यमंत्री अब्दुल सत्तर आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात गटबाजी दिसून आली होती. मात्र सत्तारांनी आता थेट आता खैरेंशी जुळवून घेतल्याने शिवसेनेतील आंतरिक विरोधकांसह इतर विरोधकांवर देखील मात देण्यात अब्दुल सत्तार यशस्वी झाले आहेत.
राष्ट्रवादी- शिवसेना आमने-सामने; अजित पवारांच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांचा कडाडून विरोध
काल सोयगाव येथे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर विजयी जल्लोष शिवसेनेतर्फे करण्यात आला ज्यामध्ये अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे सामील झाले होते. यावेळी भविष्यात सिल्लोड-सोयगांव मतदारसंघ तसेच जिल्ह्यात शिवसेनेची वाटचाल आणि घोडदौड चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली अशीच सुरू राहील, असा विश्वासही व्यक्त केला.
शिवाजी पार्क हे शिवाजी पार्क राहू द्या, त्याची स्मशानभूमी करू नका – प्रकाश आंबेडकर
एवढंच नाही तर चंद्रकांत खैरे यांनी जुने सर्व वाद विसरून सत्तार यांना पेढा भरवल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अब्दुल सत्तार यांनी देखील चंद्रकांत खैरेंची पेढेतुला करत मैत्रीचा हात पुढे केला आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे पुढील खासदार चंद्रकांत खैरे हेच असतील, अशी घोषणाच सत्तार यांनी सोयगावातून करून टाकली आहे . एवढेच नाही, तर जिल्ह्यातील यापुढील सगळ्याच निवडणुका या खैरेंच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Read also:
- पुण्यात प्रभावरचनेवरून राष्ट्रवादीत चलबिचल; प्रमुखांनी आमचा विचारच केला नसल्याची दबक्या आवाजात चर्चा
- म्हापशात काँग्रेसचा ‘रात्रीस खेळ चाले’; स्वाभिमानी मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ?
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; उद्यापासून मिळणार ऑनलाईन हॉलतिकीट
- आपल्या विचारांतून आपले संस्कार आणि संस्कृती दिसते; रुपाली चाकणकरांचा अमृता फडणवीसांना टोला
- पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत आधीच मारामारी; त्यात कशी निभावेल भाजपातील नाराजांची शिरजोरी?