सिंधुदुर्ग : राणे कुटू्ंबीयांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांची जामीनावर आज सुटका करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने आज जामिनावर निकाल दिला. त्यामुळे ते जेलमधून बाहेर येणार आहेत. राणे यांना जामीन मिळणार का, याची उत्सुकता लागली होती. अखेर त्यांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, नितेश राणे यांची तब्बेत बिघडली होती. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
म्हापशात काँग्रेसचा ‘रात्रीस खेळ चाले’; स्वाभिमानी मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ?
त्याआधी नितेश राणे यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला आहे. रात्री तीन वाजल्यापासून उलट्या होत असल्याने नितेश राणे हैराण झाले आहेत. नितेश राणे यांच्यावर कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांना जामीन मंजूर झाल्याने कार्यकर्त्यांत उत्साह दिसून येत आहे. गेले अनेक दिवस त्यांना जामीन मिळणार का, याची उत्सुकता होती.
पुण्यात प्रभावरचनेवरून राष्ट्रवादीत चलबिचल; प्रमुखांनी आमचा विचारच केला नसल्याची दबक्या आवाजात चर्चा
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्यावेळी शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे वादाच्या भोवर्यात सापडलेत. त्यांच्यावर या हल्ल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे त्यांचाच हात आहे. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर कारमधून आलेल्या दोघांनी हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.
Read also:
- माझा राजकीय खुन करण्याचा प्रयत्न; मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
- ‘भाजपसोबत जनशक्ती असल्याचे कांदोळकरांच्या लक्षात आल्याने आता ते धनशक्तीचा वापर करत आहेत’
- राज्यातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव; संजय राऊतांचे व्यंकय्या नायडूंना पत्र
- धनंजय महाडिक, पुत्र विश्वजीत महाडिक पुन्हा सक्रिय; आगामी काळात मोहोळ तालुक्यात एकहाती सत्तेसाठी उतरले मैदानात
- २०२४ला औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरेच होणार; रावसाहेब दानवेंना धक्का देत सत्तरांची सोयगावात जोरदार बॅटिंग