सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. पण, मागील काही दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखायला लागले आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे आज संध्याकाळ त्यांच्यावर सिटी अँजिओग्राफी करण्यात येणार आहे.
राज्यातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव; संजय राऊतांचे व्यंकय्या नायडूंना पत्र
गेल्या पाच दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या नितेश राणे यांना अखेर दिलासा मिळाला आहे. आज सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पण, पोलीस कोठडीत असल्यामुळे नितेश राणे यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या छातीत दुखायला लागले होते. ठरल्याप्रमाणे सायंकाळी 6 वाजता आमदार नितेश राणे याची सिटी अँजिओग्राफी केली जाणार आहे, अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.
‘भाजपसोबत जनशक्ती असल्याचे कांदोळकरांच्या लक्षात आल्याने आता ते धनशक्तीचा वापर करत आहेत’
छातीत दुखत असल्याने नितेश राणे यांना सिंधुदुर्ग मधून कोल्हापुरात हलविण्यात आलं होतं. सिंधुदुर्ग आरोग्य विभागाने केलेल्या सूचनेप्रमाणे सिटी अँजिओग्राफी केली जाणार आहे. चार डॉक्टरांच्या उपस्थित नितेश राणे यांचे सिटी अँजिओग्राफी होणार आहे. सिटी अँजिओग्राफी करण्यासाठी नितेश राणे यांना चार तासापासून कोणतही अन्न देण्यात आलेल नाही. जामीन मिळाल्यामुळे नितेश राणे सिटी अँजिओग्राफी करून घ्यायला तयार होणार की नाही याकडं लक्ष लागले आहे.
Read also:
- अण्णा हजारेन बेमुदत उपोषणाच अस्त्र उगारलं; ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाविरोधात उतरणार मैदानात
- सिंह कधी गिधाडाच्या धमकीला घाबरत नाही; संजय राउतांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
- अमरावतीत महापालिका आयुक्तांच्या अंगावर शाई फेकली; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण तापले
- मोठी बातमी: नितेश राणेंना मोठा दिलासा, जिल्हा सत्र न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर
- माझा राजकीय खुन करण्याचा प्रयत्न; मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या गौप्यस्फोटाने खळबळ