मुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मुंबईचा दादा शिवसेनाच असल्याचं विधान केलं. तसेच आम्ही जर घुसलो तर नागपूरला जाणंही त्यांना मुश्किल होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता. त्यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. शेर कभी गिदड धमकी से डरा नही करते, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळत आहेत. रोज सकाळी ९वाजता येऊन ते मनोरंजन करत असतात. संपादक असल्याने चर्चेत राहण्यासाठी काय विधाने केली पाहिजे हे त्यांना माहीत आहे, असं सांगतानाच राऊत यांचं काही म्हणणं असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन म्हणणं मांडावं, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
त्यांच्या म्हणण्याला अधिक गांभीर्याने घ्यायची गरज नाही. मोदी सरकारने कुणाला व्हिक्टिमाईज केलं नाही. मोदी सरकारमध्ये असं कधी होत नाही. त्यांनी व्हिक्टिम कार्ड खेळू नये, राऊत हे संपादक आहेत. हेडलाईन कशी द्यावी हे त्यांना माहीत आहे. दिवसभर आपल्यावर फोकस कसा राहील, आपलं नाव चर्चेत कसे राहील याप्रकारचे काम ते करत असतात, असंही ते म्हणाले.
Read also:
- अमरावतीत महापालिका आयुक्तांच्या अंगावर शाई फेकली; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण तापले
- मोठी बातमी: नितेश राणेंना मोठा दिलासा, जिल्हा सत्र न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर
- माझा राजकीय खुन करण्याचा प्रयत्न; मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
- ‘भाजपसोबत जनशक्ती असल्याचे कांदोळकरांच्या लक्षात आल्याने आता ते धनशक्तीचा वापर करत आहेत’
- राज्यातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव; संजय राऊतांचे व्यंकय्या नायडूंना पत्र