मुंबई : मागील दोन ते दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काहीसा संघर्ष सुरु असल्याचे चित्र समोर आले आहे. संजय राऊत यांनी ईडीच्या कारभारावरून केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की मुंबईत शिवसेना दादा आहे आणि आम्ही जर नागपुरात जाणं मुश्किल होईल असं खुलं आव्हान देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे आव्हान स्वीकारलं.
म्हापशात काँग्रेसचा ‘रात्रीस खेळ चाले’; स्वाभिमानी मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ?
देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना उत्तर देताना म्हटलं की सिंह कधीच गिधाडाला घाबरत नाही. संजय राऊत महाराष्ट्रात रोज सकाळी ९ वाजता येऊन मनोरंजन करतात असा टोला लगावला होता. त्यांची काही तक्रार असेल तर त्यांनी ती न्यायालयासमोर मांडावी असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला होता. त्यावर आता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. मी कोर्टात तर जाणारच आहे. मी काल लोकसभेत मुद्दाम बोललो नाही. तिथे वीर सावरकरांचं गाणं गायल्याबद्दल ह्रदयनाथ मंगेशकरांना त्यांची नोकरी गमवावी लागली असं सांगण्यात आलं.
मला कळायला लागल्यापासून मी ते ‘सागरा प्राण तळमळला’ गाणं आकाशवाणीवरुनच ऐकलं आहे. हे गाणं लोकप्रिय करण्यात आकाशवाणीचाच मोठा हात आहे. माणसाने किती खोटं बोलावं. घटनात्मक पदावरील व्यक्तीने तरी खोटं बोलू नये. पण मी त्यांना वंदन करतो असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे.
अण्णा हजारेन बेमुदत उपोषणाच अस्त्र उगारलं; ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाविरोधात उतरणार मैदानात
शिवसेनेच्या दादा वक्तव्यावरून राऊत यांनी म्हटलं आहे की हो मुंबईत शिवसेनाच दादा आहे. यावरुन टीका करण्यासारखं कारणच नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच मुंबई महाराष्ट्राची आहे आणि त्यासाठी शिवसेनेने किती संघर्ष केला आहे, हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यावेळी देखील मुंबई ओरबाडण्याचे काम झाले होते आणि आताही असे प्रयत्न सुरु आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Read also:
- एकनाथ शिंदेचा वाढदिनीच भाजपला जोरदार धक्का; भाजपच्या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
- तुम्ही मुंबईचे दादा मातोश्रीपुरतेच आहात; नारायण राणेंचा संजय राऊतांना खोचक टोला
- ‘लांडेवाडीच्या घाटात या’ मग बघू कोण कोण बसतंय घोडीवर? शिवाजीराव आढळरावांचे कोल्हेंना खुले आव्हान
- मुंबई महापालिकेवर 7 मार्चनंतर प्रशासक नेमणार; राज्य सरकारचा निर्णय
- नितेश राणेंची प्रकृती आणखी बिघडली; संध्याकाळी होणार सिटी अँजिओग्राफी