मुंबई : मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. काल झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे. 7 मार्चला मुंबई महानगरपालिकेची मुदत संपत आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे की कोणत्याही आस्थानिक संस्थेला मुदतवाढ देता येत नाही.
नागपूरात नितीन गडकरींच्या घराबाहेर आंदोलन; भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा
राज्यातील महत्वाच्या महानगरपालिकांची मुदत पुढील दोन महिन्यात संपत आहे. या महानगरपालिकांची रणधुमाळी महाविकास आघाडीसाठी महत्त्वाची असणार आहे. मात्र ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न आणि प्रभाग रचनेचा मुद्दा हा महाविकास आघाडी सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. म्हणूनच कोरोनाच्या निमित्ताने या दहाही महत्त्वाच्या महानगरपालिका पुढे ढकलण्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यात बदल करून प्रशासक नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे आणि उर्वरित इतर महानगरपालिकांमध्ये हाच निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार तयारी करत आहे.
पंतप्रधान मोदींची आज म्हापश्यात जाहीर सभा; भाजपकडून जंगी तयारी
या आधीही 2020 मध्ये पाच महानगरपालिकांची मुदत संपलेली आहे. यामध्ये औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर या पाच महानगरपालिकांची मुदत संपली आहे. कोरोनाच्या कारणास्तव या पाचही महानगरपालिकावरती राज्य सरकारने प्रशासक नेमला आहे. आता आगामी दहा महानगरपालिकांवर प्रशासक नेमण्याच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. दरम्यान, मार्च – एप्रिल ऐवजी जुन जुलै महिन्यात होणार असल्याची चर्चा होत आहे.
या महापालिकांची मुदत संपणार
- मुंबई महानगरपालिका
- ठाणे महानगरपालिका
- उल्हासनगर महानगरपालिका
- नाशिक महानगरपालिका
- पुणे महानगरपालिका
- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
- सोलापूर महानगरपालिका
- अमरावती महानगरपालिका
- अकोला महानगरपालिका
- नागपूर महानगरपालिका
Read also:
- किरीट सोमय्यांवर सूड उगवला गेलाय, आम्ही सहजासहजी घेणार नाही – चंद्रकांत पाटील
- अटक करुन जेलमध्ये टाका, असे मुख्यमंत्र्यांचे आदेश; आमदार रवी राणांचा गंभीर आरोप
- महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीची पिंपरी-चिंचवडमध्ये ‘त्रिसूत्री’
- मजबूत भाजपसाठी जोशुआंना पाठबळ द्या; अभिनेता किशन कुमार यांचे आवाहन
- अमरावतीत आयुक्तांच्या अंगावर शाईफेक प्रकरणी; आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल